जनावरांमधील थायलेरीया आजार

जनावरांमध्ये थायलेरीया हा आजार गोचीडांमार्फत जनावरांमध्ये पसरत असतो. थायलेरीया या आजाराला मराठीमध्ये गोचीड ताप असंही म्हटलं जातं.
जनावरांमधील थायलेरीया आजार
Theileriosis in animals

थायलेरीया हा परोपजीवीमुळे होणारा आजार असून याची बाधा ज्या गोठ्यात गोचीडांची संख्या जास्त असते, अशा जनावरांना होते. बाह्य परोपजीवींमध्ये गोचीड, उवा, पिसवा यांचा समावेश होतो... त्यातीलच गोचीड हा एक भयंकर उपद्रवी परोपजीवी आहे.

हेही पाहा-

थायलेरीया होण्याची कारणे-

 • हा आजार प्रामुख्याने जनावरांमध्ये थायलेरीया (Theileria) अॅन्युलाटा या परजीवीमुळे पसरतो.  
 • ज्या गोठ्यात गोचिडांची संख्या जास्त असते, अशा ठिकाणी या रोगाचा (Disease) प्रभाव जास्त प्रमाणात दिसतो.
 • थायलेरीया आजार गोचीडाच्या शरीरात असणाऱ्या जंतूमुळे इतर जनावरांमध्ये पसरतो.
 • नर व मादी गोचिडाचे जनावरांच्या अंगावर मिलन होत असते. पुढे जाऊन मादी गोचीड गोठ्यात, गव्हाणीत, अडचणींच्या जागी जाऊन अंडी घालायला सुरुवात करते.
 • गोचिडाची अंडी व तरुण गोचिड काही महिने मातीत सुप्तावस्थेत राहतात. त्या ठिकाणी जनावरे चरायला गेल्यास गोचिडांची बाधा होते.
 • लक्षणे-

 • थायलेरीयामध्ये जनावरांना भरपूर ताप (fever) म्हणजे शरीराचे तापमान साधारणतः ४१ अंश सेल्सियस पर्यंत जाते. जनावरांच्या लसिकाग्रंथीना (lymph node) सुज येते.
 • एक गोचीड जनावरांच्या शरीरातील २ ते ५ मिली रक्त (Blood) शोषून घेत असते. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्यानं हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील कमी होते. जनावरांना अनिमियाचा धोका संभवतो.
 • जनावरांनी चारा पाणी खाणे कमी केल्याने दूध उत्पादनात घट दिसून येते. जनावर मलूल, निस्तेज दिसायला लागते.
 • जनावर अस्वस्थ झाल्यानं उत्पादकता आणि कार्यक्षमता दोन्हीवर विपरीत परिणाम दिसून येतो.
 • हेही पाहा-

  थायलेरीयावरील उपाययोजना-

 • आपल्या गोठ्यातील जनावरांना थायलेरीया रोगाची बाधा झाल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्काशी संपर्क साधावा.
 • गोठ्यातील सर्व जनावरांचे वेळेवर जंतनिर्मुलन (deworming) करत राहावे.
 • गोठ्यातील गोचीडांचा बंदोबस्त करण्यासाठी फ्लेम गन च्या सहाय्याने गोठ्यातील फटी, गव्हाणीच्या भेगा जाळून घ्याव्यात.
 • गोठ्यात दर महिन्याला चुन्याचा हात मारून घ्यावा.
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.