विदर्भात मटणासाठी बेरारी शेळीचा वापर

ही शेळी उष्ण प्रदेशात चांगला तग धरून राहते. विदर्भातील ही शेळी प्रामुख्याने मटणासाठी वापरली जाते.
विदर्भात बेरारी शेळीचे होतेय संवर्धन
विदर्भात बेरारी शेळीचे होतेय संवर्धनAgrowon

महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता त्या–त्या हवामानात तग धरून राहणाऱ्या शेळ्या विकसित झाल्या आहेत. बेरारी शेळीचा (berari goat) उगम महाराष्ट्रातील वर्धा (vardha), नागपूर (nagpur) याठिकाणी झाला आहे. आपल्याकडे शेळीपालन प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी केले जाते. यासोबतच दूध, लेंडीखत, चामडीसाठीही केले जाते.

बेरारी शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी रंगाची आहे. मध्यम बांध्याची ही शेळी मांस उत्पादनासाठी विशेष लोकप्रिय आहे. त्वचेचा रंग करडा असून नाकपुड्या, खुरे इत्यादींचा रंग हा बहुतांशी काळा असतो. ही शेळी भक्कम बांध्याची असून, उंच असते. रंग काळा आणि शेपूट लांब असते.

विदर्भात बेरारी शेळीचे होतेय संवर्धन
संगमनेरी शेळी दुधासाठीही उपयुक्त

ही शेळी उष्ण प्रदेशात चांगला तग धरून राहत असल्याने तिला अग्निशिखा असे म्हटले जाते. विदर्भातील ही शेळी प्रामुख्याने मटणासाठी वापरली जाते.
- या शेळीचे कपाळ बहिर्वक्र आहे.
- नर व मादी शेळीला शिंगे असतात व त्यांची ठेवण वरून मागे झुकलेली असते.
- शेळ्यांचे कान लोंबणारे, पानाच्या आकाराची व चपटे असतात.
- शेळी प्रथम वयात येण्याचे वय हे ९ ते १० महिन्याचे असते.
- शेळीच्या दोन वेतांतील अंतर २४० दिवस, तर विल्यानंतर पुन्हा गाभण राहण्याचा काळ ९१ दिवसांचा असतो.
- शेळीचा गाभण काळ १४७ दिवस व माजाच्या चक्राचा कालावधी हा १७ दिवसांचा असतो.
- एकंदरीत प्रजनन क्षमतेचा विचार केला असता बेरारी शेळी लवकर वयात येते. दोन वर्षांत तीन वेळा विते.
- ही शेळी एका वेतामध्ये एक करडू देण्याचे प्रमाण ४१.५६ टक्के, जुळे देण्याचे प्रमाण ५६.४५ टक्के, तिळे देण्याचे प्रमाण १.८७ टक्के, तर चार पिले देण्याचे प्रमाण ०.१२ टक्के असते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com