जनावरांची वार का अडकते?

जनावर व्यायल्यानंतर साधारणतः वार सहा ते आठ तासांच्या आत बाहेर पडायला पाहिजे. प्रसूतीच्या तिसऱ्या टप्प्यात वार पडत असते. खरं तर वार पडल्यानंतरच गर्भाशय पूर्वस्थितीत येत असते.
जनावरांची वार का अडकते?
Umbilical Cord

जनावर व्यायल्यानंतर साधारणतः वार सहा ते आठ तासांच्या आत बाहेर पडायला पाहिजे. प्रसूतीच्या तिसऱ्या टप्प्यात वार पडत असते. खरं तर  वार पडल्यानंतरच गर्भाशय पूर्वस्थितीत येत असते.  गर्भाशय सुटणे, गर्भाशयास कळा येण या सर्व गोष्टी वार पडण्यासाठी आवश्यक असतात. वासराचा जन्म झाल्यानंतर वारेचे कार्य संपत असते. कारण वार हा गर्भाशयात तयार होणारा एक तात्पुरता अवयव असतो. वासरू बाहेर आल्यानंतर शरीराकडून वारेस होणारा रक्तप्रवाह बंद होतो. त्यामुळे आपसूकच वारेच्या पेशी निर्जीव होतात, त्यातील पाण्याचा अंश कमी झाल्यानं वार अंकुचन पावते. वारेचा गर्भाशयाशी संपर्क तुटून ती लांबते व वासराच्या वजनामुळे आणि गर्भाशयाच्या कळामुळे शेवटी वार बाहेर पडत असते. हेही पहा- व्यावसायिक, शास्त्रीय दृष्टिकोनातून करा प्रजनन व्यवस्थापन

वार न पडण्याची प्रमुख कारणे-

 • काहीवेळेस जनावरांमध्ये असलेल्या अनुवंशिक गुणधर्मामुळे वार बाहेर पडत नाही.
 • पहिलारू कालवड तसेच वयस्कर जनावरांमध्ये ही समस्या प्रामुख्याने दिसून येते.
 • जनावरांचा गाभण काळ पूर्ण होण्याआधीच वासराचा जन्म झाल्यास वार अडकू शकते.
 • बरेचदा नर वासरू असल्यास वार अडकण्याची समस्या दिसून येते.
 • विण्याचा कालावधी जवळ आलेली गाय किंवा म्हैस जास्त अंतर चालवत नेल्यास, योग्य प्रमाणात व्यायाम न दिल्यास वार अडकू शकते.
 • जनावरांमध्ये असलेले संप्रेरकांचे कमी प्रमाण असणं हे वार अडकण्यामागच  प्रमुख कारण आहे.
 • जीवनसत्व अ किंवा कॅरोटीन व जीवनसत्व ब सारख्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे लठ्ठ गायीमध्ये वार अडकलेली दिसून येते.
 • गर्भाशयाची अंकुचन व प्रसरण पावण्याची क्षमता कमी झाल्याने विल्यानंतर वार अडकते.
 • शस्त्रक्रिया करून वासरू काढल्यास वार अडकून राहण्याची शक्यता वाढते. गर्भाशयात पीळ पडल्यामुळे वार अडकण्याची समस्या निर्माण होते.
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.