करडांचे लसीकरण केव्हा करावे?

शेळीपालन व्यवसाय करताना कमीत कमी मरतुक आणि जास्तीत-जास्त नफा कसा होईल याकडे पशुपालकांचे लक्ष हवे. नवजात करडांचे अगदी सुरवातीच्या दिवसांत सुयोग्य व्यवस्थापन केल्यास शेळीपालन व्यवसाय जास्तीत जास्त फायदेशीर करून घेता येतो.
Vaccination in Goat Kid
Vaccination in Goat Kid

शेळीपालन व्यवसाय करताना कमीत कमी मरतुक आणि जास्तीत-जास्त नफा कसा होईल याकडे पशुपालकांचे लक्ष हवे. नवजात करडांचे अगदी सुरवातीच्या दिवसांत सुयोग्य व्यवस्थापन केल्यास शेळीपालन व्यवसाय जास्तीत जास्त फायदेशीर करून घेता येतो. शेळीपालनातील नफ्याचे प्रमाण हे करडांच्या संख्येवर, मरतुकीच्या प्रमाणावर ठरते. करडांना सुरवातीला उत्तम प्रतीचे वाळलेले गवत किंवा द्विदल वर्गातील हिरवी वैरण (Green Fodder) द्यावी. करडांचे संगोपन प्रथम शेळीच्या पोटात असताना व नंतर जन्म झाल्यावर करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी करडांचे डिवर्मिंग, लसीकरण, करडांच्या महत्त्वाच्या नोंदी या बाबींचे काटेकोर नियोजन करावे.

हेही पाहा-  नवजात करडांचे संगोपन

करडे एक महिन्याचे झाल्यावर त्यांचे डिवर्मिंग म्हणजे जंत निर्मूलन कराव. जंतांचा जीवनक्रम तीन महिन्यांचा असतो, म्हणून दर तीन महिन्याला डीवर्मिंग (Deworming) करून घ्यावं. डीवर्मिंग वर्षातून साधारणपणे चार वेळेस तीन-तीन महिन्यांच्या अंतराने करावे. करडांचे लसीकरण आणि जंत प्रतिबंधक औषधोपचार नियमितपणे करून घ्यावे. त्यामुळे करडे आजारी पडून इतर करडांना संसर्ग होणार नाही. जन्मानंतर २१ दिवसांनी करडांना आंत्रविषार लस कातडीखाली टोचली पाहिजे. त्यानंतर पुन्हा १५ दिवसांनी आंत्रविषार लसीचा दुसरा बुस्टर डोस द्यावा. त्यानंतर वर्षातून एकदा आंत्रविषार रोगाविरुद्ध लसीकरण करावे. जन्मल्यानंतर तीन महिन्यांनी करडांना बुळकांडी प्रतिबंधात्मक लस टोचावी.  त्यानंतर तीन वर्षातून एकदा प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. जन्मल्यानंतर सहा महिन्यांनी घटसर्प प्रतिबंधक लस (Vaccine) टोचावी. त्यानंतर वर्षातून एकदा दरवर्षी प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. करडाचे वेळच्या वेळी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेऊन आपण आपल्या गोठ्यात रोगांचा शिरकाव होण्यापासून वाचवू शकतो. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com