वेगन दूध म्हणजे नक्की काय?

आपल्याकडे एक संकल्पना आहे,ती अशी की प्राणी-पक्ष्यांपासून मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे मांसाहारी आणि वनस्पती,झाडांपासून मिळणाऱ्या गोष्टी शाकाहारी. अर्थात त्याला काही अपवादसुद्धा आहेत. जसेकी प्राण्यापासून मिळणारे दूध आणि त्या दुधापासून तयार केलेले अनेक पदार्थ असंख्य शाकाहारी लोकांच्या प्रोटीनचा पर्याय आहे.
vegan milk
vegan milk

आपल्याकडे  एक संकल्पना (concept) आहे, ती अशी की प्राणी-पक्ष्यांपासून मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे मांसाहारी आणि वनस्पती, झाडांपासून मिळणाऱ्या गोष्टी शाकाहारी. अर्थात त्याला काही अपवादसुद्धा आहेत.  जसे की प्राण्यापासून मिळणारे दूध आणि त्या दुधापासून तयार केलेले अनेक पदार्थ असंख्य शाकाहारी लोकांच्या प्रोटीनचा(protein) पर्याय (option) आहे. नवजात बालकापासून वृद्धापर्यंत सगळेच आहारात दुधाचा वापर करतात.

बदाम, सोयाबीन, नारळ आणि ओटपासून बनविले जाते. एकंदरीत वनस्पती किंवा वनस्पतीजन्य पदार्थांपासून बनविले जाते. तुम्ही बदाम मिल्क शेक, नारळ पाणी तर पिले असेलचं, पण आता बदामाचं (almond) दूधही आहारात वापरले जाते. आता तर सोयाबीनचे (soybean) दूध वापरले जाते, हे तेच सोयाबीन जे पोल्ट्री (poultry) उद्योगात कोंबड्यांच्या खाद्यात मोठ्या प्रमाणात वापरले जाते.  

हेही पाहा-  स्वच्छ दूध उत्पादन का गरजेचे 

आपण जे दूध सध्या पितोय त्यातले दोन घटक असे आहेत की, जे फक्त याच दुधाच्या माध्यमातून आपल्याला मिळतात. पहिली तर दुधात असणारी लॅक्टोज (lactose) नावाची साखर आणि दुसरी दुधात असणारे, केसिन (casien) नावाचे प्रोटीन. आता दुधातील ही शर्करा पचवू न शकणाऱ्या लोकांसाठी लॅक्टोज  फ्री मिल्कसुद्धा बाजारात उपलब्ध आहे. मग वेगन दुधात, याला दुधासारखे बनविण्यासाठी अनेक रसायनांचा कृत्रिमरित्या वापर केला जातो. म्हणून याला आपण फार फार तर एक पेय म्हणू शकतो. मात्र ते कोणत्याही परिस्थितीत त्याला दुधाचा दर्जा दिला जाऊ शकत नाही. याउलट आपल्याला आपल्या गोठ्यातील गायी-म्हशींपासून मिळणारे दूध, हे त्यांच्या कासेतच तयार होत असते, ते आपण कृत्रिमरीत्या तयार करत नाही. अर्थात यात भेसळीचा मुद्दा वगळूनच. आम्ही फक्त शास्त्रीय माहिती सांगू शकतो.. लोकांनी काय खावं? आणि काय खावू नये? याबाबतचा निर्णय तुमचा तुम्हालाच घायचाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com