संगमनेरी शेळीचे शारीरिक गुणधर्म

संगमनेरी शेळी ही जात मांस व दूध उत्पादनासाठी वापरली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर हे या जातीचे मुळ स्थान असल्याने तिला संगमनेरी हे नाव पडले आहे.
sangamneri goat breed
sangamneri goat breed

शेळ्यांच्या आकाराचा विचार केल्यास असे लक्षात येईल की, शेळ्यांना रहायला कमी जागा लागते, तसेच त्यांना खायलाही कमी लागते. सर्वसाधारणपणे एका गायीला लागणाऱ्या वैरणीमध्ये जवळ-जवळ ७ ते ८ शेळ्यांचे पोट भरू शकते. ज्या शेतकऱ्याकडे खुप कमी जमीन आहे किंवा जे शेतकरी भूमिहीन आहेत अशा लोकांसाठी शेळीपालन एक उत्तम व्यवसाय आहे.  

संगमनेरी शेळी ही जात मांस (chevon) व दूध (milk) उत्पादनासाठी वापरली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर (sangamner) हे या जातीचे मुळ स्थान असल्याने तिला संगमनेरी (sangamneri) हे नाव पडले आहे. सोबतच ही शेळी पुणे जिल्ह्याच्या इतरही काही भागात आढळून येते.

हेही पाहा -  शेळ्या-मेंढ्याचा पीपीआर आजार 

या शेळीची शिंगे पातळ, टोकदार व मागे वळालेली आणि वरच्या दिशेने असतात. ८ ते १२ टक्के शेळ्यांना शिंगेच नसतात. ही शेळी पांढऱ्या, तपकिरी अशा रंगामध्ये आढळून येते. कान मध्यम व लोंबकळणारे असतात. कपाळ बहिर्वक्र आणि सपाट असते. या शेळ्यांमध्ये दाढीच प्रमाण कमी असते. व्यायल्यानंतर ही शेळी अर्धा ते दीड लिटरपर्यंत दूध देते. एका वेतातील दूध उत्पादन साधारणपणे ८० लिटर इतके असते. दूध देण्याचा कालावधी हा सरासरी १८० दिवसांचा असतो. दोन वेतातील अंतर ३३३ दिवस असते. आठ महिने वय असताना शेळी प्रथम वयात येत असते. पहिल्यांदा गाभण राहण्याचे वय हे १४ महिने असते. या शेळीचा माजाचा कालावधी ४१ तासांचा असतो. दोन माजामधील अंतर साधारणपणे १७ दिवसांचे असते.

मादीचे वजन ३२ किलोपर्यंत तर नराचे वजन ३९ किलोपर्यंत असते. जन्माच्या वेळी करडांचे वजन १ ते १.५ किलोच्या जवळपास असते. एक करडू देण्याचं प्रमाण-७५ टक्के, जुळी करडे देण्याचे प्रमाण २१ टक्के , तिळ्याचे प्रमाण ४ टक्के असते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com