संगमनेरी शेळी दुधासाठीही उपयुक्त

महाराष्ट्रात वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आहे. विविध रंगाच्या, आकारच्या शेळ्या महाराष्ट्राच्या विविध भागात आढळून येतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी, संगमनेरी, बेरारी आणि कोकण कन्याळया प्रमुख चार जाती आढळून येतात.
संगमनेरी शेळी दुधासाठीही उपयुक्त
what are goat breeds for milk ?

महाराष्ट्रात वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आहे. विविध रंगाच्या, आकारच्या शेळ्या महाराष्ट्राच्या विविध भागात आढळून येतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी (Osmanabadi), संगमनेरी (Sangamneri), बेरारी (Berari) आणि कोकण कन्याळ (konkan kanyal) या प्रमुख चार जाती आढळून येतात.

हेही पाहा- दुधासाठी विदेशातील शेळीचा वापर लाभदायक

मांस, दूध, लेंडी खत, चामडीसाठी आपल्याकडे शेळ्यांच पालन केलं जात. अर्धबंदिस्त शेळीपालनासाठी शिफारस केलेली संगमनेरी शेळी दूध आणि मांस या दोन्ही उत्पादनासाठी वापरली जाते. ही जात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर हे या जातीचं मुळस्थान असल्यानं तिला संगमनेरी हे नाव पडले आहे. सोबतच ही  शेळी पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या इतरही काही भागात आढळून येते. संगमनेरीला महाराष्ट्रातील दुधाची राणी असं संबोधल जातं. हेही वाचा- कोण-कोणत्या कारणामुळं नासतं दूध ? शारीरिक वैशिष्ट्ये-

 • संगमनेरी शेळ्या निम्म्याहून अधिक या पांढऱ्या रंगाच्या असतात.
 • ६६ टक्के शेळ्या या पांढऱ्या रंगाच्या तर १६ टक्के शेळ्या तांबड्या रंगाच्या असतात.
 • उरलेल्या शेळ्या या पांढरट तांबड्या रंगाच्या दिसून येतात.
 • या शेळ्यांचे नाक रोमन प्रकारचे असून काळ्या किंवा तांबड्या रंगाचे असते.
 • कपाळ बहिर्वक्र आणि सपाट असते.
 • मटण आणि दुधासाठी (milk)  हिचा वापर केला जातो.
 • साधारणतः ८ ते १२ टक्के शेळ्यांना शिंगे नसतात.
 • शिंगे पातळ, टोकदार व मागे वळालेली आणि वरच्या दिशेने असतात.
 •  काही संगमनेरी शेळ्यांमध्ये तुरळक प्रमाणात दाढी दिसून येते.
 • या शेळीमध्ये जुळी करडे देण्याचं प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. तिळ्याचे प्रमाण ३ टक्के असते.
 • खुरे काळ्या किंवा तांबड्या रंगाचे असतात.
 •  व्यायल्यानंतर ही शेळी अर्धा ते दीड लिटरपर्यंत दूध देते.
 •  एका वेतातील दूध उत्पादन साधारणपणे ८० लिटर इतके असते.
 • दूध देण्याचा कालावधी हा सरासरी १८० दिवसांचा असतो. दोन वेतातील अंतर ३३३ दिवस असते.
 • आठ महिने वय असताना शेळी प्रथम वयात येत असते.
 • पहिल्यांदा गाभण राहण्याचे वय हे १४ महिने असते.
 • या शेळीचा माजाचा कालावधी ४१ तासांचा असतो.
 • दोन माजामधील अंतर साधारणपणे १७ दिवसांचे असते.
 • जन्माच्या वेळी करडांचे वजन १ ते १.५ किलोच्या जवळपास असते.
 • एक करडू देण्याचं प्रमाण ७५ टक्के जुळी करडे देण्याचे प्रमाण-२१ %, तिळ्याचे प्रमाण- ४ % असते.
 • शेळ्यांच्या खाद्याचा विचार केल्यास त्या कमी खर्चात जास्त उत्पादन देऊ शकतात. शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला. शेळ्यांच्या नैसर्गिक आहारात ६० टक्के खाद्य झाडपाला असतो. 

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.