जनावरांनी गाजर गवत खाल्ल्यानंतर होणारे दुष्परिणाम

जसजसा उन्हाळा जवळ यायला लागतो, तसतसे वातावरणातील तापमान वाढत असते. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई भासू लागते. तशी आपल्याकडे हिरव्या चाऱ्याची टंचाई ही पावसाळा वगळता इतर ऋतुत योग्य व्यवस्थापनाभावी नेहमीच असते.
What are the toxic symptoms of parthenium hysterophorus in animals?
What are the toxic symptoms of parthenium hysterophorus in animals?

जसजसा उन्हाळा जवळ यायला लागतो, तसतसे वातावरणातील तापमान वाढत असते.  उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई भासू लागते. तशी आपल्याकडे हिरव्या चाऱ्याची टंचाई ही पावसाळा वगळता इतर ऋतुत योग्य व्यवस्थापनाभावी नेहमीच असते. उन्हाळ्यात जनावरे हिरव्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे मिळेल तो हिरवा चारा, वनस्पती खाण्याचा प्रयत्न करतात. या विषारी वनस्पतीमध्ये बेशरम, घाणेरी, गुंज, धोतरा आणि गाजर गवत यांसारख्या वनस्पतींचा समावेश होतो.

हेही वाचा-  चारा अति प्रमाणात दिल्याने जनावरांना होते विषबाधा

जनावरांनी या गवताचे सेवन अति प्रमाणात केल्यास त्यांना विषबाधा (poison) होते, जनावरांना गुंगी येते, ते खाली बसतात, खाण्याचे प्रमाण कमी होते. जनावरे पाय मारायला लागतात. तीव्रता जास्त असल्यास जनावरांचा मृत्यु होण्याचा संभव असतो. 

महाराष्ट्रात (maharashtra) १९७०-७२ पासून या गवताचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. महाराष्ट्रात गाजर गवताला पांढरी फुली, चटकचांदणी आणि ओसाडी या नावाने संबोधले जाते. गाजर गवताचे शास्त्रीय नाव पार्थेनियम हिस्टोरोफोरस (Parthenium Historeforus) हे आहे. याची पाने गाजराच्या पानासारखी चिरलेली असतात, त्यामुळे त्याला गाजरगवत हे नाव पडले आहे. गाजरगवताच्या झाडांना मोठ्या संख्येने फुले येतात. त्यापासून हजारो बिया तयार होऊन त्याचा प्रसार होत असतो. या गवताचा प्रसार शेतावरील बांध, पडीत जमीन, चराऊ कुरणे, नदी-नाले याभागात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. दुभत्या जनावरांनी गाजर गवत खाल्ल्यास दुधाची चव बदलते, आणि गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होतो. गाजर गवतामध्ये पारथेनिन नावाचा विषारी घटक आढळून येतो.

लक्षणे

 • जनावरांना त्वचेचे रोग (skin disease) होतात.
 • जनावरांच्या अंगाला खाज सुटते, कातडी तडकते.
 • जनावरांना श्वसनाचे (respiratory) विकार संभावतात.
 • अंगावर फोड येऊन फुटतात. त्यामुळे जनावरांना जखमा होतात.
 • बाधित जनावरांच्या दुधाला कडवट चव येते.
 • प्रतिबंधात्मक उपाय-

 • गाजर गवतापासून (gajar gavat) शेती आणि वनस्पतीचे होणारे नुकसान लक्षात घेता, गाजरगवताचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी राज्यात दरवर्षी सामूहिकरीत्या गाजरगवताच्या नियंत्रणाबाबत ग्रामपंचायत, पंचायत समिती, व इतर संस्थाच्या मदतीने गाजरगवताचे सामूहिकरीत्या निर्मुलन केलं पाहिजे.
 • आपल्या परिसरात कोणत्या प्रकारची विषारी झाडे-झुडपे आहेत, त्याची विषबाधा कशाप्रकारे करता येईल, याची माहिती असणे गरजेचे आहे. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच विषबाधेवर उपचार करून घ्यावेत.
 • विषारी झाडपाला खाल्ल्यामुळे जनावरांचा मृत्यू होत नाही. परंतु विषारी घटकांचा अंश दूध, अंडी किंवा मांसामध्ये उतरतो. त्यामुळे मानवामध्ये विषबाधा होते.
 • उपचार

 • पशुवैद्यकांच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचे इंजेक्शन तसेच लिव्हर टॉनिक (liver tonic) द्यावे.
 • बाधित जनावरांना गोठ्यात सावलीत बांधून ठेवावे.जैविक नियंत्रणामध्ये झायगोग्रामा बायकोलेरॅटा (Zygograma bicolorata) या मेक्सिकन भुंग्याची शिफारस गाजर गवत निर्मुलनासाठी शिफारस केली आहे. हे भुंगे पाऊस नसताना प्रतिहेक्टरी  ३ ते ४ लाख इतक्या संख्येने गाजरगवत बाधित क्षेत्रात सोडल्यास ते या गवताची पाने फस्त करून या तणाच्या वाढीस आळा घालते.
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Agrowon
  www.agrowon.com