बायपास फॅट कसे काम करते?

बायपास फॅट हे असे खाद्य आहे जे जनावरांच्या कोठी पोट म्हणजे रुमेनमध्ये न जाता सरळ खऱ्या पोटात म्हणजे अॅबोमॅसम (abomasum) मध्ये पचन केले जाते.
What is the importance of Bypass fat for ruminating animals ?
What is the importance of Bypass fat for ruminating animals ?

रवंथ करणाऱ्या जनावरांचे पोट चार कप्प्यामध्ये विभागलेले असते. हे चार कप्पे म्हणजे कोठी पोट, पडदे पोट, जाळी पोट, पडदे पोट आणि खरे पोट होय.  बायपास फॅट हे असे खाद्य आहे जे जनावरांच्या कोठी पोट म्हणजे रुमेनमध्ये न जाता सरळ खऱ्या पोटात म्हणजे अॅबोमॅसम (abomasum) मध्ये पचन केले जाते.

हेही पाहा- दुधातील फॅट व एसएनएफ कमी लागण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

कोठीपोटातील सुक्ष्मजीवाणु (micro-organism) आत येणाऱ्या कोणत्याही पदार्थांचे विघटन प्रथिनामध्ये (protein) करत असतात. बायपास फॅटचे (bypass fat)  विघटन कोठीपोटामध्ये होत नाही. बायपास फॅटचे पचन जनावरांच्या कोठीपोटात (rumen) न होता, सरळ आतड्यामध्ये होते. परिणामी त्यापासून मिळणारी ऊर्जा ही फक्त दूध उत्पादनासाठी वापरली जाऊन, दूध (milk) उत्पादनात वाढ झालेली दिसून येते.

 बायपास फॅटचे कार्य कसे करते?

  • आपण आपल्या गोठ्यातील जनावरांना जे चारा, पशुखाद्य देत असतो, यांच विघटन करण्याचं काम हे रुमेन मधील सूक्ष्म जीवाणु करत असतात.
  • हे सुक्ष्मजीवाणु सर्व प्रकारच्या प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थांचे रुपांतर स्वतः च्या शरीर पेशीमध्ये करत असतात.
  • यामुळे चांगल्या प्रकारची प्रथिने, स्निग्ध पदार्थ अधिक दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायी-म्हशींना त्वरित उपलब्ध होत नाहीत.
  • बायपास फॅटचे मुख्य कार्य हेच आहे की, ते थेट आतड्यामध्ये जाऊन त्याचं पचन केलं जाते.
  • बायपास फॅटमुळे जनावरांच्या शरीरातील उर्जेची गरज पूर्ण होते, वासरांची दैनंदिन वाढ योग्य होते, कालवडी योग्य वयात माजावर येतात, दुभत्या गायी-म्हशी त्यांच्या क्षमते इतके दूध उत्पादन करू शकतात.हेही 
  • दूध उत्पादन, प्रजनन यासारख्या कारणांसाठी लागणारी उर्जा बायपास फॅटमुळे जनावरांना त्वरित उपलब्ध होत असते.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com