गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?

ब्रॉयलर किंवा लेयर मध्ये त्यांना आपण वयानुसार स्टार्टर, ग्रोवर आणि फिनिशर देत असतो.गावरान कोंबड्याच चिकन आणि ब्रॉयलरच चिकन यात काय फरक असतो?
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?
Which Chicken Taste Good?

कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी कधी खाल्लीय का? आहो चिकन... मग ती ब्रॉयलर असो लेयर असो कि आपली गावरान असो... काही वेगळे भाग खायला मिळतात का ? तर नाही... मात्र चवीत काहीसा फरक असतो... तो असण सहाजिकच आहे. कारण दोन्हीचं पालनपोषण वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. फरक असतो त्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्यात… commercial ब्रॉयलर किंवा लेयर मध्ये त्यांना आपण वयानुसार स्टार्टर, ग्रोवर आणि फिनिशर देत असतो आणि आपल्याकडील गावरान कोंबड्या ज्या आपल्या परसात वावरत असतात त्यांना आपण काय देतो? खरतर आपणा सर्वाना विचारात टाकणारा हा प्रश्न आहे? आपण या कोंबड्याना खाद्य देतो कि त्या त्याचं काहीही खाऊन घेतात. कधी-कधी गावाकडे आपली आई तांदूळ निवडताना पहिली असेल तर मुटभर तांदूळ कोंबड्याना टाकत असते. बसं एवढचं काय ते त्यांना आपण देत असतो. आमच्याकडे कि नाही पूर्वी रेशनला मिळणारी कणी आणून ती कोंबड्याना खाद्य म्हणून दिली जायची...किंवा तांदूळ निवडताना निघालेली कणी देखील कोंबड्यासाठी दिली जायची.

तुम्ही कोंबडीला कापलीय का? खाण्यासाठी. तेही जाऊद्या...तुम्ही कधी चिकन आणायला खाटकाच्या दुकानात गेलाय का? आणि कलेजी-चुनाळ मागितलीय का? ज्याला काही स्थानिक ठिकाणी कलेजी-पेठा असंही म्हटलं जात. यालाच इंग्रजीमध्ये ‘गिझार्ड’ असं म्हंटल जातं... याला कधी साफ करताना पाहिलंय का? हीच असते कोंबडीची पचनसंस्था. गिझार्डचे आतील आवरण हे खडबडीत असते. गावरान कोंबड्यानी खालेल्ल म्हणजे दगडाचे किंवा वाळूचे लहान-लहान कण या गिझार्डमध्ये जाऊन बसतात. कधी स्वतः साफ केलं असेल किंवा साफ करताना पाहिलं असेल... तर लक्षात आल असेल...खडबडीत अनेक स्तरांच आवरण आतील भागात असल्यान त्यांच्या हालचालीने खालेल्ल अन्न बारीक करून त्याचं पचन केलं जाते.

गावरान कोंबड्याच चिकन आणि ब्रॉयलरच चिकन यात काय बर फरक असेल ? तर फरक काही नसतो गावरान कोंबड  काहीही खाऊन स्वतःच पोट भरत असल्यान त्याला काहीशी वेगळी चव येत असते. पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी असल्यान त्याची किमंत देखील जास्त आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.