झीज भरून काढण्यासाठी कोणतं खनिज द्याल ?

जितकेजास्त दुधाचेउत्पादन तितक्या जास्त प्रमाणात जनावरांना क्षार-मिश्रणांची गरज भासत असते. दुभत्या जनावरांच्या शरीरातून बाहेर येणाऱ्या दुधाबरोबर कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखी अनेक खनिजे बाहेर येत असतात. यांच प्रमाण जरी अल्प असलं, तरी त्यांची आवश्यकता गरजेची असते.
zinc deficiency
zinc deficiency

जितके जास्त दुधाचे उत्पादन तितक्या जास्त प्रमाणात जनावरांना क्षार-मिश्रणांची गरज भासत असते. दुभत्या जनावरांच्या शरीरातून बाहेर येणाऱ्या दुधाबरोबर कॅल्शियम (calcium), फॉस्फरस (phosphorus),  मॅग्नेशियम (magnesium)यांसारखी अनेक खनिजे बाहेर येत असतात. यांच प्रमाण जरी अल्प असलं, तरी त्यांची आवश्यकता गरजेची असते. ही खनिजे (minerals) त्यांना योग्य प्रमाणात न मिळाल्यास जनावरांची कार्यक्षमता कमी होऊन दूध (milk)  उत्पादनात घट दिसून येते.

हेही पाहा - जनावरांमध्ये खनिजांची कमतरता होण्याची प्रमुख कारणे

ही क्षार-मिश्रणे जनावरांच्या शरीरात तयार केली जात नाहीत. आपण जो चारा जनावरांना खायला देतो, ते पिक वर्षनुवर्षे त्याच जमिनीत घेतल्यानं जमिनीतील या मुलद्र्व्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्यामुळे जनावरांना आहारातून क्षार-मिश्रणे दिली पाहिजेत.

हेही वाचा -खनिज कमतरतेमुळे दुभत्या जनावरांमध्ये होणारे आजार झिंक कमतरतेमुळे जनावरांमध्ये दिसणारी लक्षणे - -    यात गायी-म्हशींच्या बिजांडावर गाठी येतात. -    गायी-म्हशी वेळेत माजावर येत नाहीत. -    जनावरांमध्ये माज दिसल्यास तो अनियमित दिसू लागतो. -    वळूमध्ये लैंगिक पेशींची योग्यरित्या वाढ होत नाही. -    वळूच्या वीर्याची प्रत खालावते, वळूच्या वृषणाचा आकार कमी होतो. -    जनावर व्यायल्यानंतर गर्भाशयाची झीज भरून काढून ते पूर्ववत करण्याच्या कामात झिंक महत्वाची भूमिका बजावते.

हेही वाचा- जनावरांमध्ये खनिजांची कमतरता होण्याची प्रमुख कारणे झिंकच्या तीव्र कमतरतेमुळे शरीरात असे अनेक बदल होतात, ज्यामुळे जनावर पटकन कोणत्याही रोगाला बळी पडू शकतात. खनिज मिश्रणे योग्य प्रमाणात न मिळाल्यास, जनावरांची कार्यक्षमता कमी होऊन दूधउत्पादनात घट होते. क्षारांच्या कमतरतेमुळे दुभत्या गायी-म्हशी वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात. त्यामुळे जनावरांना सकस, संतुलित आहाराबरोबर आवश्यक प्रमाणात क्षारांचा समवेश करणे गरजेचे असते. यासाठी गोठ्यामध्ये चाटण विटा टांगून ठेवाव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com