वराह पालन का करावे?

वराहपालनहे प्रामुख्यानेमांस उत्पादनासाठी केलेजाते.अधिक मांसाचे उत्पादन घेण्यासाठी मादी डुक्करांनी गाभण राहून जास्तीत जास्त पिल्लांना जन्म दिला पाहिजे.
Why to do Pig Farming and Increasing Demand Of Pork ?
Why to do Pig Farming and Increasing Demand Of Pork ?

पशुपालनाचा व्यवसाय करताना अनेक प्रकारचे व्यवसाय केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे पिग फार्मिंग म्हणजेच वराहपालन होय. बाजारपेठेतील वाढती मागणी आणि वराहाच्या मांसाचे पौष्टिक मुल्य लक्षात घेता लोक या व्यवसायाकडे वळू लागले आहेत. वराहपालन हे प्रामुख्यान मांस (Pork) उत्पादनासाठी केले जातं. अधिक मांसाचे उत्पादन घेण्यासाठी मादी डुक्करांनी गाभण राहून जास्तीत जास्त पिल्लांना जन्म दिला पाहिजे. गंमत म्हणजे यांचा गाभण काळ ११४ दिवसांचा म्हणजे जवळपास ३ महिने ३ आठवडे आणि ३ दिवसांचा असतो. म्हणजे १५ महिन्यातून ३ वेळा पिल्लांना जन्म देऊ शकतात. यातली प्रमुख बाब अशी की एका वेळी जन्माला येणाऱ्या पिल्लांची संख्या ६ ते १२ इतकी असू शकते. ज्याला लिटर साईझ म्हंटल जाते. वराहामध्ये सरासरी मांस उतरण्याच प्रमाण ७०% इतकं आहे. सहा महिन्याच्या कालावधीत मांस उत्पादनासाठी वराह (Pig) तयार होतात.

हेही पाहा-  शास्त्रीय वराह पालन घुंगरू (Ghungroo) ही डुकराची एक स्‍वदेशी जात आहे. ही जात स्‍वयंपाकघरातील उरलेल्या अन्नपदार्थांवर आणि शेतीमधील दुय्यम उत्पादनावर स्वतःचे पोट भरून चांगल्या प्रतीच्या पोर्कचे उत्‍पादन देते. घुंगरू बहुतेक काळ्या रंगाचे व थेट बुलडॉगसारख्‍या (BullDog) चेहर्‍याचे असततात. तसेच एकावेळी सहा ते बारा पिले देते ज्‍यांचे जन्‍माच्‍या वेळचे वैयक्तिक वजन सुमारे एक किलोग्राम आणि दूध सोडल्‍यावर सात ते दहा किलोग्राम असते. ह्याचे नर व मादी फार सौम्य स्‍वभावाची व हाताळण्‍यास सोपी असतात.  डुकराचे मांस लाल रंगाचे असून त्यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं वराह पालन करण्यास खुप संधी आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com