Animal Care : जनावराच्या आहारात हिरवा चारा का आहे महत्वाचा?

जनावरांच्या समतोल आहाराच्या दृष्टीने खुराक, हिरवा चारा, वाळलेला चारा यांचे योग्य प्रमाण असावे लागते.
जनावरांना दररोज ताजा हिरवा चारा द्यावा.
जनावरांना दररोज ताजा हिरवा चारा द्यावा.green fodder is important in animal feed

जनावरांच्या समतोल आहाराच्या दृष्टीने खुराक, हिरवा चारा, (Green Fodder) वाळलेला चारा यांचे योग्य प्रमाण असावे लागते. जनावराच्या शारीरिक वाढीसाठी व दुग्ध उत्पादनासाठी (Milk Production) आवश्‍यक असणारी पोषणमूल्ये सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्यापासून मिळतात. सकस हिरव्या चाऱ्यात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, शर्करायुक्त पदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. दुधाचे उत्पादन हे जनावराच्या आहारावर व त्याच्या वजनावरून ठरविता येते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हिरव्या चाऱ्याविषयी पुढील माहिती दिली आहे.

जनावरांना दररोज ताजा हिरवा चारा द्यावा.
पावसाळ्यात जनावरांना हिरवा चारा किती द्याल?

दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्याचे महत्व

अधिक उत्पादनाकरिता तसेच जनावरांचे स्वास्थ्य अधिक काळ उत्तमरीत्या टिकवून ठेवण्याकरिता हिरवा चारा दैनंदिन आहारात देणे गरजेचे आहे. जनावराच्या आहारात साधारणपणे ७० टक्के हिरव्या चाऱ्याचे प्रमाण असावे लागते. यामध्ये चाऱ्याची हिरवा चारा व कोरडा चारा अशी विभागणी होते. हिरव्या चाऱ्यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे हे मुबलक प्रमाणात असतात.

हिरव्या चाऱ्याचे फायदे काय आहेत?

हिरव्या चाऱ्यामध्ये विविध घटक हे विद्राव्य स्वरूपात असल्यामुळे जनावरांना पचनाचा त्रास होत नाही.

कॅरोटीन असल्यामुळे जनावराची त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते.

जनावरांना दररोज ताजा हिरवा चारा द्यावा.
जनावरे वारंवार उलटण्याची समस्या

ग्लुटेमिक, आर्जींनिन आम्ल असल्यामुळे जनावरांनादेखील या आम्लांचा पुरवठा होतो.

गाभण जनावरांच्या आहारातील हिरव्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे जन्मनारी वासरे ही अशक्त, कमजोर असतात.

दुधाची उत्पादन क्षमता ही जास्त काळ टिकवायची असेल, तर जनावरांच्या आहारात हिरवा चारा असलाच पाहिजे. हा चारा पचनास सुलभ असतो.

हिरव्या चाऱ्यापासून मुरघास तयार करून ठेवावा. त्याचा उपयोग इतर हंगामात म्हणजेच उन्हाळ्यात देखील करता येतो.

हिरव्या चाऱ्यामध्ये एकदल वर्गीय चारा पिकांपैकी ज्वारी, बाजरी, मका, यशवंत, जयवंत, गुणवंत, दशरथ या चारा पिकांचा समावेश होतो तर द्विदल पिकामध्ये बरसीम, लसूणघास, चवळी, स्टायलो या पिकांचा समावेश होतो.

शारीरिकदृष्ट्या हिरव्या चाऱ्यामध्ये पोषक अाणि सकस घटक भरपूर प्रमाणात असतात

प्रथिनांचे प्रमाण एकदल वर्गीय चाऱ्यामध्ये ४ - ७ टक्के असतात, तर द्विदल वर्गीय चाऱ्यामध्ये १५ - २० टक्के प्रथिने असतात.

हिरवा चारा हा रुचकर, पाचक, तसेच चविष्ट असल्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात.

हिरव्या चाऱ्याच्या तुलनेने वाळलेल्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते. जनावरांना खनिजे, प्रथिने ही हिरव्या चाऱ्यातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com