Dairy Animal : दुभत्या जनावरांसाठी चीक धोकादायक का आहे?

वासरु जन्माला आल्यानंतर त्याला अर्ध्या तासाच्या आत चीक पाजला जातो. चीक वासरासाठी अमृता समान आहे. पण हाच चीक जर प्रौढ गाई, म्हशींना पाजला तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
 colostrum
colostrum Agrowon

वासरु जन्माला (Calf) आल्यानंतर त्याला अर्ध्या तासाच्या आत चीक (colostrum) पाजला जातो. चीक वासरासाठी अमृता समान आहे. पण हाच चीक जर प्रौढ गाई, म्हशींना पाजला तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. काही भागातील पशुपालक प्रौढ म्हशींना आणि गाईंना चीक पाजतात. ही व्यवस्थापनातील चुकीची व अशास्त्रीय पद्धत आहे. प्रौढ गाई, म्हशींना चीक पाजल्याने विषबाधा किंवा अपचन होते. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक, विस्तार शिक्षण डॉ. अनिल भिकाने आणि उदगीर येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील डॉ. रविंद्र जाधव यांनी प्रौढ गाय आणि म्हशींना चीक पाजल्यामुळे होणाऱ्या विषबाधेविषय़ी दिलेली माहिती पाहुया.

 colostrum
Animal New Breed : महाराष्ट्रातील गाय आणि म्हशीच्या नव्या जातींची नोंद | ॲग्रोवन

चीक वासरांसाठी उपयुक्त कसा?

चिकामध्ये दुधाप्रमाणेच शर्करा, स्निग्धांश, प्रथिने, खनिज, क्षार तसेच जीवनसत्वे हे अन्नघटक आढळून येतात. दुधाशी तुलना करता चिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण ३ ते ३.५ पट जास्त असते. एवढ्या जास्त प्रमाणात उपलब्ध असलेली प्रथिने पचविण्याची क्षमता ही वासरांच्या पोटाच्या एक कप्प्यामध्ये असते. त्यामुळे चीक हा वासरांसाठीचा पचनीय असा परिपूर्ण आहार आहे. 

 colostrum
Animal Care : गाय, म्हशीतील प्रजनन व्यवस्थापन कसे ठेवाल?

गाई, म्हशींसाठी चीक का आहे हानीकारक? 

काही पशुपालक जास्तीचा चीक वाया जाऊ नये म्हणून त्याच व्यायलेल्या गाई, म्हशीला पाजतात. चीक पचविण्याची प्रौढ गाई, म्हशींची क्षमता ही नवजात वासरांपेक्षा कमी असते. त्यामुळे अशाप्रकारे जर चीक प्रौढ दुभत्या गाई, म्हशीला पाजल्यास त्यांना अल्कधर्मी अपचन होऊन त्यातून विषबाधा होऊ शकते. बाधित म्हशींमध्ये चिकाचे पोटात विघटन होऊन प्रथिनांपासून अमोनिया तयार होतो, जो रक्तात शोषला गेल्यावर त्याचा मेंदूवर परिणाम होऊन विषबाधा तीव्र होते.

जनावराला चीकबाधा झाल्याचे कसं ओळखाल?

चारा खाणे, पाणी पिणे बंद होते. रवंथ करणे बंद होते. दुग्धोत्पादन घटते. बद्धकोष्ठता होते, सुस्तपणा येतो. पाजलेल्या चिकाच्या प्रमाणात पोट फुगते, गच्च होते. 

सुरुवातीला जनावर बेचैन होते. त्यानंतर जनावरे भिंतीवर व जमिनीवर डोके घासतात. 

अडखळत चालतात किंवा चालताना तोल जातो.  

मान एका बाजूला पूर्णपणे वळवून जास्त वेळ शांत उभे रहाते. 

थरथर कापते किंवा गोल गोल फिरते. तात्पुरते डोळ्यांना दिसत नाही. 

बाधित जनावर जास्त वेळ बसून रहाते किंवा शांत उभे राहाते.

अतितीव्र विषबाधेमध्ये म्हशींमध्ये ग्लानी येते. अशा म्हशी बेशुद्ध पडतात. योग्य उपचार न झाल्यास दगावण्याची शक्यता असते. 

पशुवैद्यकांकडून वेळेवर योग्य उपचार पद्धतीचा अवलंब केल्यास बाधित जनावरामध्ये २ ते ३ दिवसांत सुधारणा दिसून येते. साधारणपणे ५ ते ७ दिवसांत अशा गाई, म्हशी पूर्णपणे बऱ्या होतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com