Mineral mixture: दुधाळ जनावरांना खनिजमिश्रण का द्यावे?

दुधाळ जनावरांमध्ये दुधाचे उत्पादन आणि प्रजननक्षमता टिकवून ठेवण्यासाठी खनिजांची भूमिका महत्त्वाची असते.
Why should milch animals be given mineral mixtures?
Why should milch animals be given mineral mixtures?Agrowon

दुधाळ जनावरांमध्ये (Milky Animals) दुधाचे उत्पादन (Milk Production) आणि प्रजननक्षमता टिकवून ठेवण्यासाठी खनिजांची (mineral mixtures) भूमिका महत्त्वाची असते. जनावरांच्या शरीरामधून वेगवेगळ्या मार्गाने खनिजे बाहेर पडतात. त्यांची उणीव भरून काढण्यासाठी खनिज मिश्रणाची आवश्यकता असते. हाडांमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसची मात्रा राखून ठेवण्यासाठी, रक्तात लाल पेशींच्या निर्मितीसाठी आणि पाचक रसांच्या उत्तम कार्यासाठी खनिजे आवश्यक असतात. जनावरांच्या खाद्यात खनिज मिश्रणाचे महत्व काय, याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहूया.

Why should milch animals be given mineral mixtures?
जनावरांना द्या वजनानुसार खाद्य

जनावरांतील खनिज कमतरतेची कारणे कोणती?

 • जनावरांना हिरवा आणि वाळलेला चारा पुरेशा प्रमाणात दिला जातो; परंतु खनिज द्रव्यांकडे विशेष लक्ष दिले जात नाही.

 • दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये मुख्यतः धान्य, ढेप, हिरवा व सुक्या चाऱ्याचा वापर होतो. ज्यामधून आवश्यकतेनुसार प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ उपलब्ध होतात; परंतु खनिजांची पूर्तता होऊ शकत नाही.

 • काही पशुपालक जनावरांना फक्त हिरवा चारा आणि सुका चारा देतात.

Why should milch animals be given mineral mixtures?
Animal Care : योग्य प्रजनन, दूध उत्पादनासाठी समतोल आहार महत्त्वाचा

खनिजमिश्रण देणं का आवश्यक आहे?

 • उत्तम आरोग्यासाठी आणि शरीराच्या चांगल्या वाढीसाठी जनावरांच्या आहारात ऊर्जा आणि प्रथिनांशिवाय खनिज द्रव्यांचे व जीवनसत्त्वाचे पुरेसे प्रमाण असणे महत्त्वाचे असते.

 • जनावरांच्या आहारामध्ये सामान्य क्रिया घडवण्यासाठी कर्बोदके, प्रथिने व क्षार जास्त प्रमाणात तर जीवनसत्त्वे व खनिजे कमी प्रमाणात लागतात.

 • जनावरांच्या आहारामध्ये एकूण २२ खनिजांची आवश्यकता असते. ज्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, गंधक, सोडिअम, पोटॅशिअम आणि क्लोरिन ही सात प्रमुख खनिजे आहेत.

 • सूक्ष्म खनिजांमध्ये मुख्यतः लोह, जस्त, मॅंगेनीज, तांबे, आयोडीन, कोबाल्ट आणि सेलेनिअम अशा १५ सूक्ष्म खनिजांचा समावेश होतो.

खनिज कमतरतेमुळे कोणते दुष्परिणाम होतात?

 • दुधाळ जनावरांची खनिजांची गरज पूर्ण न झाल्यामुळे दूध उत्पादनावर आणि प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतात.

 • जनावरांची चयापचय क्रिया व्यवस्थित होत नाही.

 • दूध उत्पादनात कमतरता आढळून येते.

 • जनावर माजावर येत नाही आणि माजावरआले तरी मुका माज दाखवते.

 • गर्भाशयामध्ये दोष निर्माण होण्यास सुरवात होते.

 • दुधाळ जनावरांचा भाकड काळ वाढतो. त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com