पशुवैद्यकांअभावी दवाखाने बंद अवस्थेत

चार कर्मचारी निवृत्त होणार; अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा भार
पशुवैद्यकांअभावी दवाखाने बंद अवस्थेत
Veterinariansagrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
इस्लामपूर, जि. सांगली : वाळवा तालुक्यातील दीड लाखावर पशुधनाच्या उपचारासाठी २४ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. परंतु त्यामधील बहुतांशी पशुवैद्यकीय केंद्रे पशुवैद्यकांअभावी बंद अवस्थेत आहेत. आणखी चार पशुवैद्यकीय कर्मचारी सेवानिवृत्त व बदली झाल्याने कामाचा भार पडेल. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी होणारे लसीकरण, पावसाळ्यात येणारी पूरस्थिती, उपचाराअभावी तालुक्यातील पशुधन धोक्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

राज्य शासनाच्या अंतर्गत तालुक्यात एकूण १६ दवाखान्यात पशुवैद्यकीय सुविधा राबविण्यात येत होती. तर पंचायत समितीतर्फे आठ गावांत पशुवैद्यकीय सुविधा राबविण्यात येत होती. तालुक्यात राज्य शासनाच्या फक्त ११ केंद्रांत पशुवैद्यकीय डॉक्टर(Veterinary doctor) उपलब्ध आहेत. बाकीच्या केंद्रांत पशुधन पर्यवेक्षकांची आठ पदे रिक्त आहेत. तर पंचायत समितीची आठ केंद्रे सुरू आहेत. त्या केंद्रात एक पशुधन विकास अधिकारी, तर पशुधन पर्यवेक्षकांची सात पदे रिक्त आहेत. एकूण पशुधन १ लाख ५० हजार व त्याकरिता पशुवैद्यकीय संख्या फक्त १९ इतकी होती. यात आणखी भर म्हणजे राज्य शासनाचे तीन पशुवैद्यक सेवानिवृत्त, तर एकाची बदली झाली आहे. त्यामुळे पशुधन अधिकच धोक्यात आले आहे.

Veterinarians
पर्यटन विकासाद्वारे महिलांनी व्यवसाय सुरू करावे ः घोलप

डॉक्टरांवर कामाचा ताण येत आहे. त्यामुळे आवश्यक त्या वेळी हे शासनाचे डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नाहीत. यामध्ये शेतकरी भरडला जाऊ लागला आहे. काही ठिकाणी दोन वर्षे, काही ठिकाणी पाच वर्षे झाली तरी त्या केंद्रांत डॉक्टर उपलब्ध नाहीत, या बाबीकडे कोणी ही गांभीर्याने बघताना दिसत नाही.

प्रत्येक महिन्याला शासनाला पशुवैद्यक रिक्त पदाचा अहवाल पाठवत आहे. पुरबाधित क्षेत्र आहे. मनुष्यबळ आवश्यक आहे. यासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. नवीन पद भरती किंवा कंत्राट पद्धतीने भरती करण्याचे आदेश आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

डॉ. एस. ए. धकाते, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, मिरज (सांगली)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com