Animal care : जातिवंत वळूची शास्त्रीय तपासणी महत्वाची

गायींची जोपासना दुधासाठी जितकी महत्त्वाची तितकेच बैल शेतीकामासाठी उपयुक्त आहेत. जातिवंत वळू जोपासना, शारीरिक निगा, खरारा, पौष्टिक आहार देणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आहार, पैदास आणि आरोग्य व्यवस्थापन यशस्वी पशुसंगोपनाची त्रिसूत्री आहे.
Purebred Bull
Purebred BullAgrowon

गोवंश संवर्धन (Cow Rearing) करताना शुद्ध वंशाचे जनावरे (Purebred Animal) अधिक असणे गरजेचे आहे. ज्या वळूत संबंधित देशी वंशाचे (Indigenous Bull) बाह्य लक्षणे आणि प्रजोत्पादन (Reproduction) गुणधर्म दिसून येतात त्यास जातिवंत वळू म्हणतात. रंगरूप, शारीरिक ठेवण, बांधा इत्यादी तर प्रजोत्पादन गुणधर्म म्हणजे उत्तम पिल्लावळ निर्माण करण्याची क्षमता. एखाद्या वळूपासून जन्माला येणारे वासरू/ कालवडी कशा आहेत याची चाचणी करावी. भारतात देशी गोवंशाच्या ५० देशी जाती आहेत. देशातील एकूण ५० गायींच्या जातींपैकी महाराष्ट्रात मुख्यतः ६ जाती आढळतात. साधारणतः उपयोगितेनुसार गायींच्या दुधाळ, दूध आणि शेतीकाम आणि केवळ शेतीकामासाठी उपयुक्त अशा तीन प्रवर्गात विभाजन करता येईल. भारतातील गीर (गुजरात), साहिवाल (पंजाब), लाल सिंधी (पंजाब) आणि थारपारकर (राजस्थान) या अधिक दूध देणाऱ्या जाती दुधाळ वर्गात मोडतात. महाराष्ट्रात देवणी, डांगी, गवळाऊ, खिल्लार, लाल कंधारी आणि कोकण कपिला या जाती आढळतात. सकस दूध देण्याची क्षमता याशिवाय निकृष्ट दर्जाचा चारा पचविण्याची क्षमता, काही रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता यांसारखे गुणधर्म या पशुधनात आढळतात.

जातिवंत वळू आणि देशी पशुसंवर्धनाचा संबंध ः

१) शुद्ध वंश हा दोन शुद्ध वंश मादी आणि वळू यांच्या संकरातून निपजला जातो. कळपात एक उत्तम वळू अनेक माद्यांना रेतनासाठी पुरेसा असतो. कृत्रिम रेतनाद्वारे एक वळू अनेक पिलांना पिता ठरू शकतो.

२) गोवंश संवर्धन करण्यासाठी संबंधित गोवंशाचे उत्तम वळू जोपासणे महत्त्वाचे आहे.

३) प्रत्येक पशुधनाची विशिष्ट अशी शारीरिक डौलदार बांधणी असते. म्हणून उत्तम वळू निवडताना ज्या जातीचा वळू निवडायचा आहे त्या जातीची जातीनिहाय गुणधर्म आपणास माहिती असावी.

४) शरीराच्या प्रत्येक भागाचे अपेक्षित रूप वळूत असावे. उंच डोके, रुंद मुख, विस्फरलेल्या नाकपुड्या, चमकदार डोळे, मजबूत खांदा, रुंद छातीचा घेर, सरळ खुरे, समान उंचीचे पाय, वशिंड, घाटदार शिंगे, पोटाशी घट्टपणे चिकटलेले मुतान, समान व सुडौल अंडकोष इत्यादी लक्षणे संबंधित वळू उत्तम असल्याची पावती देतात.

५) वळूची वर्तणूक, फलनक्षम आणि माद्यांच्या संपर्कात येताच प्रतिक्रिया दक्षतेने देणारा असावा. उत्तम वळू हा चपळ, कार्यक्षम, निरोगी आणि तरुण वयाचा असावा.

Purebred Bull
Animal Care : गाय, म्हशीतील प्रजनन व्यवस्थापन कसे ठेवाल?

जातिवंत वळू निवडीसाठी शास्त्रीय तपासण्या ः

१) वळूचा वापर व्यावसायिक पातळीवर करण्यात येतो, तेव्हा वळूची निवड केवळ बाह्यलक्षणे आणि रूपावर अवलंबून ठेवता येत नाही. वळूच्या प्रजनन गुणधर्माचा लेखाजोखा त्याच्या वीर्यपरीक्षण माध्यमातून घ्यावा.

२) ज्या वळूची निवड करायची आहे त्याच्या विर्यात असलेली शुक्राणूसंख्या आणि त्यातही जीवित शुक्राणू संख्या अधिक महत्त्वपूर्ण आहे.

३) वळू ब्रुसेल्लोसिस आदी सारख्या जिवाणूजन्य आजारांपासूनमुक्त असावा.

४) क्यारिओटायपिंग म्हणजेच रंगसूत्रातील दोष (संख्या किंवा आकार) तपासणी महत्त्वपूर्ण आहे. जिल्हापातळीवर कार्यरत पशू रोगनिदान प्रयोगशाळा, वीर्य परीक्षण केंद्र किंवा खासगी प्रयोगशाळेतून चाचणी करावी.

५) क्यारिओटायपिंग तपासणीतून वळूंच्या रंगसूत्रांच्या संख्येत किंवा आकारातील दोष लक्षात येतात.

६) रोबार्ट्सोनियन ट्रान्सलोकेशन रंगसूत्रातील दोषात दिसला तर उमदा व सक्षक्त वळू प्रजननाच्या दृष्टीने अकार्यक्षम असतो.

Purebred Bull
Animal Care : मृत जनावराचे शवविच्छेदन का करावे?

कळपातील उत्तम वळूची निवड ः

१) प्रस्थापित शासकीय किंवा अशासकीय पशूप्रक्षेत्रावरून वळू निवडताना वैयक्तिक गुणधर्म आणि लक्षणे तपासणी हा मुख्य आधार असावा. प्रत्येक वळूची प्रजनन क्षमता नोंदीवरून कळेल.

२) वळूंच्या आई वडिलांची उत्पादन किंवा प्रजोत्पादन संबंधी माहिती प्रक्षेत्रावरील वंशावळ पाहून समजते. प्रत्येक वळू पासून निर्मित संततीचा आढावा घ्यावा. ज्या वळूच्या कालवडी अधिक उत्पादनक्षम आढळतील, साहजिकच त्या वळूची आनुवंशिक क्षमता उच्च प्रतीची असते. या क्रमवारीवरीतेमधून सिद्ध वळू निवडावा. यासाठी पैदासशास्त्रातील पशुवैद्यकाची मदत घ्यावी.

३) आहार, पैदास आणि आरोग्य व्यवस्थापन यशस्वी पशूसंगोपनाची त्रिसूत्री आहे.

यामध्ये दैनंदिन व्यवस्थापन, निवारा, प्रकाश, हवेशीर, खरारा, खूर तपासणी, वातावरणातील बदलानुरूप नियोजन तपासावे.

पैदास व्यवस्थापन ः

वळूचे वय आणि प्रजनन क्षमता

आंतरपैदास ः धोके टाळण्यासाठी दर दोन वर्षांनी गोठ्यातील वळू बदलावा.

बाह्यपैदास ः क्रमोन्नती ही शुद्ध वंशाचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त.

संकर- सम संकर / भिन्न वंश संकर हे लक्षात घ्यावे.

संपर्क ः डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९

(सहायक प्राध्यापक, पशू आनुवंशिक व पैदासशास्त्र विभाग, स्ना.प.प. संस्था, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com