Lumpy Skin : ‘साडेसात हजार जनावरे ‘लम्पी स्कीन’मधून बरी’

सातारा : ‘‘जिल्ह्यात लम्पी स्कीन आजारग्रस्त ७ हजार ४६२ जनावरे नियमित औषध-उपचाराने बरी झाली आहेत. ४ हजार ६१ पशुधनावर उपचार सुरू आहेत,’’ अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

सातारा : ‘‘जिल्ह्यात लम्पी स्कीन आजारग्रस्त (Lumpy Skin Infected Livestock) ७ हजार ४६२ जनावरे नियमित औषध-उपचाराने बरी झाली आहेत. ४ हजार ६१ पशुधनावर उपचार (Livestock Treatment) सुरू आहेत,’’ अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन (Animal Husbandry) उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.

Lumpy Skin
Lumpy Skin : लम्पी स्कीन’ मुळे ८३ जनावरे दगावली

‘‘जिल्ह्यात ११ तालुक्यांतील १९९ गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. आजअखेर १० हजार ४५३ गाय व १ हजार ८८९ बैल असे एकूण १२ हजार ३४२ जनावरांस लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin: सांगलीत सहा हजारांवर जनावरे बाधित

जिल्ह्यात माण-५, खटाव-४, सातारा-२, पाटण-१ अशा एकूण १२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण ८१९ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यातील एकूण १२ हजार ३४२ पशुधनाला लम्पी स्कीन आजाराची बाधा झाली आहे.

आतापर्यंत एकूण ७ हजार ४६२ जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झाली आहेत. तर ४ हजार ६१ पशुधनावर उपचार सुरू आहेत,’’ असे डॉ. परिहार यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com