Lumpy Skin : जिल्ह्यात प्रादुर्भावाची व्याप्ती वाढतीच

जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराने ३६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जवळपास ६१ गावातील ७४० जनावरांना त्याची लागण झाली आहे. सध्या त्यापैकी ४५९ जनावरांवर उपचार सुरु आहेत.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीनच्या आजाराची (Lumpy Skin Disease) व्याप्ती वरचेवर वाढतच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराने ३६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. (Cattle Death) जवळपास ६१ गावातील ७४० जनावरांना त्याची लागण झाली आहे. सध्या त्यापैकी ४५९ जनावरांवर उपचार सुरु आहेत.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे आतापर्यंत ३ हजार ९२ पशुधनाचा मृत्यू

गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरांची संख्या वरचेवर वाढतच आहे. अवघ्या पाच बाधितावरुन आता तब्बल साडेसातशे पर्यंत जनावरे बाधित होत आली आहेत. तसेच जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका वगळता अन्य दहा तालुक्यातील ६१ गावामध्ये ही जनावरे आढळली आहेत.

Lumpy Skin
Lumpy Vaccine : शेळ्यांची ‘गोट पॉक्स’ लस ‘लम्पी’वर ठरतेय प्रभावी

पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाची मोहिमही सुरु आहे. पण हा आजार अद्याप तरी नियंत्रणात आलेला दिसत नाही. वरचेवर रुग्णसंख्या वाढतच आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार बाधित क्षेत्रातील गायवर्ग जनावरे २ लाख ४१ हजार ५७२ इतकी असून, या एकूण बाधित क्षेत्रातील १ लाख ७० हजार ६६८ जनावरांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे.

तर बाधित क्षेत्र सोडून ३ लाख ६८ हजार ९७४ जनावरांचे लसीकरण झाले आहे. तर पशुसंवर्धन विभाग आणि खासगी क्षेत्रातून असे एकत्रित ६ लाख ८८ हजार ४६६ म्हणजे ९२.३७ टक्के इतके एकूण लसीकरण झाले आहे. तर बाधित ७४० जनावरांपैकीआतापर्यंत एकूण २४५ जनावरे बरी झाली आहेत.

तर ४५९ जनावरांवर उपचार सुरु आहेत. लसीकरण सुरुच, मदतीचेही वाटपजिल्ह्यातील एकूण गोवंश पशुधन जवळपास ७ लाख ४५ हजार ३२४ इतके आहे. तर जिल्ह्याला आतापर्यंत सुमारे ५ लाख ४६ हजार ५०० लसमात्रा मिळाल्या आहेत. त्यापैकी सध्या ६८५८ लस उपलब्ध आहेत.

अत्यवस्थ पशुंना पाहण्यासाठी सहा पशु वैद्यकीय तज्ज्ञांची पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याशिवाय मदतीसाठी दहा कॅालेज विद्यार्थ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे. आतापर्यंत मृत जनावरांच्या दहा पशुपालकांना सुमारे २ कोटी ८० लाखाची मदतही वाटण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com