मेंढपाळांच्या वाड्यावर पोहोचले तीस डॉक्टर

काळा खडक व जनुना येथील मेंढपाळांच्या मेंढ्यांना रोगाची लागण झाल्याने शेकडो मेंढ्यांचा मृत्यू झाला. त्याची तत्काळ दखल घेत जिल्ह्यातील ३० पशुवैद्यकीय डॉक्टरांचा चमू या ठिकाणी पोहोचला.
sheep
sheepAgrowon

पथ्रोट, जि. अमरावती : काळा खडक व जनुना येथील मेंढपाळांच्या मेंढ्यांना रोगाची लागण (Disease Outbreak In Sheep's) झाल्याने शेकडो मेंढ्यांचा मृत्यू (Sheep Died) झाला. त्याची तत्काळ दखल घेत जिल्ह्यातील ३० पशुवैद्यकीय डॉक्टरांचा चमू या ठिकाणी पोहोचला. त्यांनी प्रथमोपचार सुरू केले आहेत. या घटनेत मृत पावलेल्या मेंढ्यांची संख्या आता हजारांवर जाऊन पोहोचली आहे.

sheep
Animal Care : जनावरांमध्ये चिलटांमुळे होतो हा आजार

शनिवारी (ता. २०) सकाळी साडेसात वाजल्यापासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आजारी मेंढ्यांना प्रथम उपचार करून काही मेंढ्यांचे रक्तनमुने घेतले, तर मृत पावलेल्या मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. मेंढ्यांच्या तोंडाला फोड येणे, अंगात ताप येणे, पायाला जखम होणे हा प्रकार संसर्गजन्य आहे.

अशा प्रकारचा आजार साधारणतः पावसाळ्यात ओला चारा खाल्ल्याने होतो. तर ब्लू टंग, पायरेकझिया, तोंडखुरी-पायखुरी किंवा प्लुरो न्यूमोनिया अशा चार आजारांत अशी लक्षणे दिसतात, असा डॉक्टरांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. हा आजार एकदा उद्‍भवल्यास तीन दिवसांच्या तीन स्टेपमध्ये जनावरांचा मृत्यू होतो. म्हणून त्याकरिता रविवारपासून या ठिकाणी डॉक्टरांच्या उपस्थितीत शिबिर घेतले जाणार आहे.

जनुना, काळा खडक मिळून मेंढपाळांच्या वस्तीमध्ये एकूण तीस हजारांवर मेंढ्यांची संख्या आहे. त्यामुळे या ठिकाणी शासनाने कायमस्वरूपी पशुवैद्यकीय दवाखाना द्यावा, अशी मागणी शासनाकडे करणार आहे.
सुधीर रसे, जिल्हा उपाध्यक्ष भाजप, अमरावती
जोपर्यंत आजारी मेंढ्यांच्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत नेमके कारण माहीत पडणार नाही. त्यामुळे रक्ततपासणी अहवाल आल्यानंतरच योग्य उपचार करता येईल.
दयाराम थोटे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com