Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ रोखण्यास तत्काळ लसीकरण करा ः डॉ. दयानिधी

पशुधनाचे ‘लम्पी स्कीन’पासून संरक्षण करण्यासाठी या आजाराची लागण झालेल्या पशुधनाच्या पाच किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व पशुधनाची लसीकरण मोहीम तत्काळ सुरू करा.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

सांगली ः पशुधनाचे ‘लम्पी स्कीन’पासून संरक्षण (Protection From Lumpy Skin) करण्यासाठी या आजाराची लागण (Lumpy Skin Infection) झालेल्या पशुधनाच्या (Livestock) पाच किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व पशुधनाची लसीकरण मोहीम तत्काळ सुरू करा. आजाराच्या प्रतिबंधासाठी ‘पशुसखीं’ना प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा

‘लम्पी स्कीन’ या आजाराच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. ७) बैठक झाली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, पशुधन विकास अधिकारी डॉ. अमित चौगुले, सहायक पशुधन विकास अधिकारी वीरूपक्ष खंदारे उपस्थित होते.

डॉ. दयानिधी म्हणाले, लम्पी स्कीन या आजाराने जिल्ह्यात सद्यःस्थितीत सहा जनावरे बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदृढ जनावरांना त्याची बाधा होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाने सर्व ती खबरदारी घ्यावी. पशुसंवर्धन विभागाने औषध फवारणीची मोहीम सुरू करावी. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी ‘लम्पी स्कीन’संदर्भात सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.

‘बाधित जनावरे बाहेर सोडू नयेत’

पशुधन मालकांनी बाधित जनावरे कुरणामध्ये अथवा चरण्यासाठी बाहेर सोडू नयेत. त्यांचे दूध काढून ते वापरू नये, तत्काळ नष्ट करावे. लम्पी स्कीन आजारामुळे पशुधन दगावल्यास त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. आयुर्वेदिक उपचार म्हणून हळद, निंबोळीचा पाला, करंजीचे तेल यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com