Milch Animal Diet
Milch Animal DietAgrowon

Milch Animal Diet : दुधाळ जनावरांसाठी अधुनिक आहार पद्धती कोणत्या आहेत?

उच्च दूध देणाऱ्या गाई व म्हशींच्या आहार व्यवस्थापनात युरिया मोलासेस मिनरल ब्लॉक, एक्सोजेनस एन्झाइम आणि चयापचय आणि किण्वन सुधारकाचा वापर फायद्याचा ठरतो.

दुधाळ गाई, म्हशींना खाद्यामार्फत अन्नघटक पुरविले नाहीत, तर त्या स्वतःच्या शरीरात साठवून ठेवलेली ऊर्जा, इतर अन्नद्रव्य घटकांचा वापर करतात.

याचा एकंदरीत परिणाम दुग्धोत्पादन (Milk Production), शरीरावर होतो. हे टाळण्याकरिता समतोल आहार व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

यासाठी उच्च दूध देणाऱ्या गाई व म्हशींच्या आहार व्यवस्थापनात (Animal Diet Management) युरिया मोलासेस मिनरल ब्लॉक (Mineral Block), एक्सोजेनस एन्झाइम आणि चयापचय आणि किण्वन सुधारकाचा वापर फायद्याचा ठरतो.

उच्च दूध देणाऱ्या गाई व म्हशींच्या आहार व्यवस्थापनाविषयी  डॉ. दिनेश भोसले आणि डॉ. विठ्ठल मुंडे यांनी दिलेली माहिती पाहुया. 

१) युरिया मोलासेस मिनरल ब्लॉक 

रवंथ करणाऱ्या जनावरांच्या रुमेनमध्ये मोठ्या प्रमाणात फायदेशीर सूक्ष्मजीव असतात, जे खाद्याच्या तंतुमय घटकांचे पचन करण्यास मदत करतात.

हिरव्या चाऱ्याच्या टंचाईच्या काळात, युरिया मोलासेस मिनरल ब्लॉक जनावरांच्या पोटाच्या रुमेन च्या भागातील सूक्ष्मजंतूंची वाढ होण्यास मदत करते.

त्यामुळे कोरड्या चाऱ्याची पचनक्षमता सुधारते. युरिया, गुळ, खनिज मिश्रण व इतर पदार्थ योग्य प्रमाणात मिसळून युरिया मोलासेस मिनरल ब्लॉक तयार करतात.

दुधाळ जनावरांसाठी ऊर्जा, प्रथिने आणि खनिज घटकांचा हा चांगला स्रोत आहे. जनावरांना युरिया मोलासेस मिनरल ब्लॉक खाऊ घातल्याने त्यांना भरपूर पोषक द्रव्ये मिळतात, तसेच युरियाचे कमी प्रमाणात सेवन केल्याने अधिक प्रमाणात जैव-प्रथिने तयार होतात, त्यामुळे जनावराची पचनक्रिया सुधारते.

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ने (एनडीडीबी) युरिया मोलॅसेस मिनरल ब्लॉक तयार करण्याची ‘कोल्ड प्रोसेस’ विकसित केली आहे. 

Milch Animal Diet
Milch Animal Diet : दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ जनावरांना द्या योग्य आहार

२) एक्सोजेनस एन्झाइम

एक्सोजेनस एन्झाइम्सचा वापर पिकांच्या अवशेषांच्या चांगल्या वापरासाठी आहे. हे एन्झाइम्स प्रामुख्याने सेल्युलोज, हेमिसेल्युलोज किंवा बुरशीजन्य असतात.

एन्झाइम पावडर, दाणेदार किंवा द्रव स्वरूपात असू शकतात. ते खाण्याआधी चाऱ्यावर फवारणी केल्यास प्रभावीपणे काम करतात.

एन्झाइम्स आहारात मिसळल्यामुळे रुमेनची हायड्रोलाइटिक क्षमता वाढते. वाढीसाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढते.

Milch Animal Diet
Milch Animal Scheme : दुधाळ जनावरांच्या किमतीत दुपटीने वाढ

३) चयापचय आणि किण्वन सुधारक

पोषक तत्त्वांचा वापर, खाद्य कार्यक्षमता, वाढीचा दर, दुधाचे उत्पन्न आणि त्याची रासायनिक संरचना सुधारण्यासाठी जनावरांना खायला दिले जाते, इंजेक्शन दिले जाते. किण्वन सुधारक खाद्यामध्ये रुमेन किण्वन हाताळण्यासाठी वापरली जातात.

दोन्ही चयापचय आणि किण्वन मॉडिफायर्स (मिथेन इनहिबिटरस, प्रोटोजेनिक, डी आणि ई) एजंट्स, मायक्रोबियल एन्झाइम्स, बफर एजंट्स, आयनोफोर्स, प्रोबायोटिक्स, यीस्ट कल्चर्स, मोल्ड किण्वन अर्क आणि नॉन-आयोनिक सर्फेक्टंट खाद्याचा वापर आणि उत्पादक प्रतिसाद सुधारण्यासाठी वापरले जातात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com