शेणावरूनही ओळखा, जनावरांचे आरोग्य

जनावरांना विविध रोगांची बाधा होत असते. आपल्या गोठ्यातील जनावर निरोगी आहे कि त्यांना कोणत्यासंसर्गजन्य किंवा असंसर्गजन्य रोगाची लागण झालीय याचे निदान होणे आवश्यक आहे. जनावरांना होणाऱ्या विविध रोगांची बाधा जनावरांच्या शेणाच्या तपासणीवरूनही करू शकतो.
Animal health identification through dung testing
Animal health identification through dung testing

जनावरांना विविध रोगांची बाधा होत असते. आपल्या गोठ्यातील जनावर निरोगी (healthy) आहे कि त्यांना कोणत्या संसर्गजन्य किंवा असंसर्गजन्य रोगाची लागण झालीय याचे निदान होणे आवश्यक आहे. जनावरांना होणाऱ्या विविध रोगांची (disease) बाधा जनावरांच्या शेणाच्या (cow dung) तपासणीवरूनही करू शकतो. हेही  पाहा- जनावरांना पावसाळ्यात होणारे आजार, प्रतिबंध आणि उपचार पद्धती 

जनावरांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल झाल्यास हा बदल शेणाच्या बदलावरून सहज जाणवू शकतो. यासाठी पशुपालकांंनी आपल्या गोठ्यातील जनावरांचे शेण टाकण्याची पद्धत, शेण पडण्याची पद्धत, शेणाचा प्रकार म्हणजे ते घट्ट आहे कि पातळ या गोष्टींचे निरीक्षण केले पाहिजे. हेही वाचा- स्टायलो घासाची लागवड कशी करावी? शेणाच्या तपासणीवरून निदान - शेणाचा रंग (Cow dung color) –

  • सर्वसाधारणपणे हिरव्या चारा जास्त प्रमाणात खाणाऱ्या जनावरांच्या शेणाचा रंग गडद हिरवा तर  सुकलेले गवत खाणाऱ्या जनावरांच्या शेणाचा रंग  तपकिरी बदामी  दिसून येते.
  • जनावरांच्या शेणाचा रंग हा पशुखाद्यातील घटक आणि हिरव्या चाऱ्याच्या रंगामुळे येत असतो
  • जनावरांच्या पचनसंस्थेत बिघाड असल्यास रक्तमिश्रित शेण बाहेर पडते. शेणाचा रंगही करडा होतो.
  • शेणात रक्त येण्याचे कारण  हे मायकोटॉक्सीन (Mycotoxcin) किंवा कॉक्सिडियामुळेही (Coccidiya)असू शकते.
  • जिवाणूंचा संसर्ग होऊन हगवण असेल, तर ढोबळमानाने शेणाचा रंग फिकट हिरवा किंवा पिवळसर असल्याचे दिसून येते.
  • शेणाचे टेक्श्चर कसे असावे ?

  • शेणाचे  टेक्श्चर (dung texture) हे प्रामुख्याने: पाण्याचे प्रमाण आणि चारा किती वेळ पोटात राहिला यावर अवलंबून असते. 
  • जनावरांच्या आहारात प्रथिनांचे जास्त प्रमाण झाल्यास किंवा कोटीपोटात विघटन होणाऱ्या प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यास शेण पातळ झाल्याचे दिसून येते.
  • जास्तीच्या प्रथिनांतील नत्राचे विसर्जन करण्यासाठी जनावर पाणी जास्त पिते त्यामुळे शेण पातळ होते.
  • आम्लधर्मीय अपचनामध्येही शेण पातळ झाल्याचे दिसून येते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com