युक्रेनच्या मोठ्या शहरांवरील हल्ले सुरुच

रशियाने बुधवारी युक्रेनच्या ओडेसा (Odessa)आणि मॉरीपोल या दोन बंदरांसह दक्षिणकेडील काही शहरांवर जोरदार हल्ले केले. किव्ह(Kiev) आणि खारकिव्ह या दोन मोठ्या शहरांवरील हल्ले सुरुच आहेत. खारकिव्हमध्ये अनेक सरकारी इमारती आज बाँबहल्ल्यात जमीनदोस्त झाल्या.
Untitled design (52).png
Untitled design (52).png

मॉस्को : युद्धाच्या सातव्या दिवशी  म्हणजेच बुधवारीही रशियाला फारसे यश मिळालेले नाही. मात्र, रशियाने मोठ्या शहरांवरील हल्ले सुरुच ठेवले असून रणगाडे आणि चिलखती वाहनांच्या रांगा किव्हच्या दिशेने सरकत आहेत. युक्रेनमधील सरकार बरखास्त करून रशियाच्या हातातील बाहुले बनणाऱ्या सरकारची स्थापना करण्याचा यामागे उद्देश असल्याची शंका नागरिकांमधूनही व्यक्त होत आहे.

हे हि पहा : 

रशियाने बुधवारी युक्रेनच्या ओडेसा (Odessa)आणि मॉरीपोल या दोन बंदरांसह दक्षिणकेडील काही शहरांवर जोरदार हल्ले केले. किव्ह(Kiev) आणि खारकिव्ह या दोन मोठ्या शहरांवरील हल्ले सुरुच आहेत. खारकिव्हमध्ये अनेक सरकारी इमारती आज बाँबहल्ल्यात जमीनदोस्त झाल्या. रशियाने क्षेपणास्त्र(Missiles)ही डागल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यांमध्ये खारकिव्ह शहरातील बहुतांश रुग्णालयांची पडझड झाल्याचे सूत्रांनी सांगितले. येथील सिटी कौन्सिल, पोलिस मुख्यालय आणि गुप्तचर विभागाच्या कार्यालयावरही हल्ले झाले. मंगळवारी किव्हमधील टीव्ही टॉवरवर झालेल्या हल्ल्यात पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याचे येथील प्रशासनाने सांगितले. रशियाच्या सैन्याने किव्हबरोबरच खारकिव्ह, खेर्सन आणि मॉरीपोल या शहरांनाही वेढा घातला आहे.

रशियासमोरील अडचणी

युक्रेनच्या सैनिकांचा आणि नागरिकांचा चिवट प्रतिकार होत असल्याने अपेक्षेपेक्षा लवकर यश मिळत नसल्याने रशिया आक्रमक झाली असली तरी सैन्याचे पोट भरण्यासाठी लागणाऱ्या अन्नाची आणि वाहनांसाठीच्या इंधनाची कमतरता असल्याने शहरांकडे होणारी सैन्याची वाटचाल मंदावली असल्याचा दावा अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. रशियाच्या हवाई दलालाही युक्रेनच्या हवाई क्षेत्रावर अद्याप ताबा मिळविता आलेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com