छोट्या कृषी उपकरणांसाठी कर्जपुरवठ्याची गरज

गेल्या काही वर्षात भारतात बऱ्यापैकी यांत्रिकीकरण घडून आले आहे, मात्र तरीही इतर आधुनिक विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच नगण्य असे असल्याचे प्रतिपादन या क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.
small farm machinery
small farm machinery

उत्पादनातील नावीन्य आणि छोट्या शेतकऱ्यांच्या यांत्रिकीकरणासाठी सरकारकडून वित्तीय मदत येण्याचे धोरण राबवले तरच भारत कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणाबाबत विकसित देशांसोबतच्या स्पर्धेत उतरू शकेल, अशी अपेक्षा या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. 

भारतातील कृषी यांत्रिकीकरणाचा आढावा घेणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) अलीकडील एका अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालानुसार आजमितीस देशातील कृषी क्षेत्रात झालेलया यांत्रिकीकरणाचे प्रमाण ४० ते ४५ टक्के एवढेच आहे. हे प्रमाण प्रगत अर्थव्यवस्था असलेल्या आणि ब्रिक्स समूहांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प असेच आहे. 

अमेरिकेतील कृषी यांत्रिकीकरणाचा प्रमाण ९५ टक्के आहे. तर पश्चिम युरोपमध्ये कृषी यांत्रिकीकरणाचे प्रमाण ९५ टक्के आहे. रशियात ८० टक्के कृषी यांत्रिकीकरण झालेले आहे. ब्राझिलमध्ये ७५ टक्के तर चीनमध्ये ४८ टक्के एवढे आहे. 

भारतातील कृषी यांत्रिकीकरणाच्या वाटचालीचा आढावा घेतलेला आपल्याला गेल्या काही वर्षांत ट्रॅक्टरचा वाढता वापर दिसून येतो. मात्र ट्रॅक्टरशिवाय अन्य उपकरणांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. पॉवर टिलर्स, रोटावेटर ट्रान्सप्लांटर या उपकरणांचा वापर मोजक्या प्रमाणात आहे. हे प्रमाण अवघे १५ टक्के भरते. छोट्या छोट्या तुकड्यांत विखुरलेल्या शेतजमिनींमुळे भारतातील कृषी यांत्रिकीकरणात अडसर निर्माण होतो आहे.    

कृषी यांत्रिकीकरणामुळे कृषी उत्पादकतेत ३० टक्क्यांची वाढ होऊ शकते. तसेच उत्पादन खर्चात २० टक्क्यांची बचत होऊ शकते. या प्रकारच्या यंत्रांच्या वापराने शेतीकामासाठी  वेळेतही बचत होते अन शेतीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या टंचाईवरही मत करता येते.  

देशभरात शेतीसाठी होणारा ट्रॅक्टरचा सर्रास वापर म्हणजे कृषी यांत्रिकीकरण नाही, असे मत व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडचे  मुख्य कार्यकारी अधिकारी अँटोनी चेरुकारा यांनी व्यक्त केले आहे.  भारतातील ७० टक्के शेतकरी अल्पभूधारक आणि छोटे आहेत. ते ६ ते ७ लाख रुपयांचे ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत. 

या छोट्या शेतकऱ्यांना परवडेल अशी पॉवर टिलर्स, राईस ट्रांसप्लांटर्स उपलब्ध आहेत. आपल्याकडेही नवनवी उत्पादने घेता येतील. बाहेरच्या बाजारातील उपकरणे इथे आणण्यापेक्षा आपल्या अल्पभूधारक, छोट्या शेतकऱ्यांना परवडू शकतील, उपयुक्त ठरू शकतील, अशी उपकरणे हवी असल्याचेही चेरुकारा यांनी म्हटले आहे. 

कृषी यांत्रिकीकरणासाठी अल्पभूधारक, छोट्या शेतकऱ्यांना वित्तपुरवठ्याची यंत्रणा असणे गरजेचे आहे. ट्रॅक्टर्ससाठी नव्हे तर छोटी कृषी उपकरणे घेण्यासाठी या शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करण्याचे उद्दिष्ट नाबार्डने बँकांना द्यायला हवे आहे. 

कर्जपुरवठ्याचे धोरण राबवताना कृषी यांत्रिकीकरणासाठी प्राधान्य द्यायला हवे. बँकांना या छोट्या कृषी उपकरणांची माहिती नसते, त्यामुळे बँक केवळ माध्यम आणि श्रीमंत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्जपुरवठा करतात. त्यामुळे सरकारने बँकिंग क्षेत्राला कर्जपुरवठ्यासंदर्भात धोरण राबवताना कृषी उपकरणांच्या खरेदीचा प्राधान्यक्रम ठरवून द्यायला हवा. त्यामुळे कृषी यांत्रिकीकरणास गतिमानता प्रदान करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.    

दिवसेंदिवस कृषी क्षेत्रात मनुष्यबळाच्या टंचाईचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. अशावेळी अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडू शकतील अशी ही छोटी उपकरणे हाताशी असतील तर शेतकरी पिकपद्धतीतही बरेचसे बदल घडवून आणू शकतात.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com