कृषी विकासासाठी हवा संतूलीत दृष्टीकोन

अधिक संशोधन, शास्तशुद्ध मार्गदर्शक आणि समस्या निवारणाच्या जोरावर कृषी रसायने व कीटकनाशकांमधील करसवलतीचा निर्णय राबवला तर भारतही उत्पादनाचे अपेक्षित उद्दिष्ट लक्ष्य गाठू शकतो असा विश्वास आर. जी.अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.
Agricultural Development
Agricultural Development
स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारतीय शेतीच्या वाटचालीचा इतिहास ही एक कथा ठरली आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. अन्नधान्याच्या कमतरतेपासून ते अन्नाधान्य उत्पादनात (Food production) स्वावलंबी होईपर्यंत आणि हरित क्रांतीनंतरच्या (Green revolution) काळात अतिरिक्त उत्पादनापर्यंतची कृषी क्षेत्राची वाटचाल थक्क करणारी असल्याचे प्रतिपादन आर. जी. अग्रवाल यांनी 'हिंदू बिझनेस लाईन'मध्ये लिहिलेल्या लेखात नमूद केले आहे.        

हेही वाचा - ब्राझील, अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन घटणारः युएसडीए

१९९० च्या दशकातही झालेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे (Indian economy) चित्र पालटले. त्यानंतर कृषी क्षेत्रावर लक्ष्य केंद्रित करण्यात यायला लागले. अन्नधान्य उत्पादनात  सातत्याने वाढ होत राहिली अन गेल्या १० ते १५ वर्षांत फलोत्पादन (फळे व भाजीपाला) विभागातील वाढीमुळे देशाच्या कृषी क्षेत्राने आमूलाग्र परिवर्तन घडून आले.

हेही वाचा - जीएम वाणाच्या चाचणीसाठी बायरचा सरकारकडे प्रस्ताव

अन्नधान्य उत्पादनाच्या तूलनेत आजवर दुय्यम स्थानावर असलेल्या फलोत्पादन क्षेत्राने गेल्या दशकात आश्चर्यकारकरीत्या अन्नधान्य उत्पादनापेक्षा आघाडी घेतल्याचा उल्लेख अग्रवाल यांनी केला आहे. अन्नधान्य आणि फलोत्पादन मिळून भारताचे कृषी उत्पादन ६५० दशलक्ष टनांवर जाते. त्यातील ३२५ दशलक्ष टन उत्पादन फलोत्पादन क्षेत्राचे तर ३१५ दशलक्ष टन उत्पादन अन्न धान्याचे असते. या विक्रमी उत्पादनाच्या प्रमाणामुळे जगभरातील कृषी क्षेत्राचे लक्ष्य भारताकडे वेधल्या गेल्याचे अग्रवाल यांनी म्हटले आहे.

उत्पादनवाढीतील सातत्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून खाद्य, पेय अथवा  FMCG  क्षेत्रासारख्या मूल्यवृद्धी क्षेत्राच्या संधी वाढल्याचा उल्लेख करत अग्रवाल यांनी, गेल्या काही दशकात या क्षेत्रातील व्यावसायिक आवाका प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः  गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील स्टार्ट अप्सची संख्या वाढल्यामुळे आर्थिक उलाढालीच्या प्रवाहातही कृषी उत्पादन व व्यवसायाने आपला ठसा उमटवला असल्याचे म्हटले आहे.

कृषी प्रक्रिया क्षेत्रात आर्थिक नियोजनांसह सक्रिय असलेल्या ॲग्रीटेक कंपन्यांमुळे कृषी क्षेत्राचाही चेहरा बदलत चालला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज ( IOT), डेटा ॲनलिस्टिकस (Data analystics) इत्यादी नव्या तंत्रज्ञानाच्या अविष्कारामुळे नव्या युगातील कृषी क्षेत्र प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे.  

या घटकांनी भारतीय कृषी क्षेत्राची नव्याने मांडणी करायला सुरुवात केली. भारतीय कृषी क्षेत्रातील परिवर्तनाचा आग्रह धरायला सुरुवात केली, ज्याचे सकारात्मक परिणाम येत्या काही वर्षांत दिसून येतील, असा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

व्हिडीओ पाहा -

चीनच्या तुलनेत भारताकडे लागवडीखालील क्षेत्र अधिक प्रमाणात असूनही उत्पादनाचे प्रमाण चीनपेक्षा कमी भरते.भारताप्रमाणे चीन रसायने आणि कीटकनाशकांकडे अति सावधगिरी वा साशंकतेने पहात नाही.अधिक संशोधन, शास्तशुद्ध मार्गदर्शक आणि समस्या निवारणाच्या जोरावर कृषी रसायने व कीटकनाशकांमधील करसवलतीचा निर्णय राबवला तर आपणही उत्पादनाचे अपेक्षित उद्दिष्ट लक्ष्य गाठू शकत असल्याचा विश्वासही अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com