यावलमध्ये केळी खरेदीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक

यावलमध्ये केळी खरेदीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक
यावलमध्ये केळी खरेदीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक

यावल, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये व्यापारी वर्गाकडून केळी पिकासाठी जाहीर होणाऱ्या दरापेक्षा कमी किमतीत केळी कापून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात अाहे, अशी तक्रार संचालक अतुल पाटील यांनी बाजार समितीच्या सभापतींकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कमी भावाने केळी खरेदी होत असताना बाजार समितीचे व्यापाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने तालुक्‍यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. बाजार समितीकडून तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दररोज जाहीर होणारे केळीचे बाजार भाव मॅसेजद्वारे पाठविले जातात. व्यापाऱ्यांकडून जाहीर भावाप्रमाणे केळी खरेदी करण्यात येते का? याची चौकशी करणे समितीची जबाबदारी आहे. मात्र समितीचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. केळी नाशवंत असल्याने याचा गैरफायदा व्यापारी वर्ग घेतात.

बाजार समितीने जाहीर बोर्डभावाप्रमाणे केळी खरेदीसाठी कडक धोरण राबवावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. शेतकरी हितासाठी असलेली बाजार समिती काय भूमिका घेते? याकडे तालुक्‍यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जळगाव बाजार समितीचेही दुर्लक्ष जळगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातही तापी व गिरणा नदीकाठालगत व्यापारी केळी खरेदीचे दर जाहीर दरांपेक्षा १०० ते १५० रुपयांनी कमी देतात. शेतकऱ्याने नकार दिला, तर अडवणूक केली जाते. व्यापाऱ्यांची लॉबी मिळून दर पाडते. जळगाव तालुक्‍यात लवकरच कांदेबाग केळीची कापणी सुरू होईल. या पार्श्‍वभूमीवर व्यापाऱ्यांच्या व्यवहारांकडे लक्ष ठेवले जावे, तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com