भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

१९७३ मध्ये संगरूच्या सतोज गावात जन्मलेल्या मान यांनी कॉमेडियन म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांनी २०११ मध्ये मनप्रीत सिंग बादल यांच्या नेतृत्वाखालील पंजाब पीपल्स पार्टीसोबत त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.२०१४ मध्ये मान आपमध्ये सामील झाले आणि संगरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवत विजयी झाले.
Bhagwant-Mann takes oath of chief minister
Bhagwant-Mann takes oath of chief minister

आम आदमी पक्षाचे (AAP) नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी बुधवारी (दिनांक १६ मार्च ) पंजाबचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची  शपथ घेतली.

शाहिद भगतसिंग यांच्या वडिलोपार्जित गावात म्हणजेच खटकर कलान येथे हा शपथविधी समारंभ पार पडला. यावेळी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Aravind Kejariwal) यांच्यासह पक्षातील आणि कुटुंबातील काही मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.

विशेष म्हणजे, कोणत्याही केंद्रीय मंत्री किंवा राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही मोठ्या नेत्याला शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. या शपथविधी सोहळ्याची खास बाब म्हणजे ज्या लोकांना या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले होते. त्यात पुरुषांना पिवळ्या रंगाची पगडी आणि महिलांसाठी पिंवळ्या रंगाच्या ओढण्या परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. भगतसिंग यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पिवळ्या रंगाला प्राधान्य देण्यात आले होते.

नुकत्याच पार पडलेल्या पंजाब विधानसभेच्या (Punjab Assembly) निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय नोंदवला, दिल्लीच्या बाहेर प्रथमच आम आदमी पक्षाने (AAP) पंजाबमध्ये एकहाती सत्ता काबीज केली आहे. 

भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी सुमारे ४५ हजारांच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. नवज्योत सिद्धू ,कॅप्टन अमरिंदर सिंह, चरणजित चन्नीसह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाला आहे.संगरूर जिल्ह्यातील धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या मान यांनी काँग्रेसच्या दलवीर सिंग गोल्डी यांच्यावर विजय मिळवला.

व्हिडीओ पहा- 

१९७३ मध्ये संगरूच्या सतोज गावात जन्मलेल्या मान यांनी कॉमेडियन म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांनी २०११ मध्ये मनप्रीत सिंग बादल यांच्या नेतृत्वाखालील पंजाब पीपल्स पार्टीसोबत त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.२०१४ मध्ये मान आपमध्ये सामील झाले आणि संगरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवत विजयी झाले. जेव्हा त्यांनी पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे सुखदेवसिंग धिंडसा यांचा पराभव केला, त्यावेळी पंजाबच्या राजकारणात त्यांचे महत्त्व वाढले. यानंतर मान यांनी संगरूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा विजय मिळवला.

शपथविधी सोहळ्यासाठी १५० एकरांवरील गहू भुईसपाट !

या शपथविधी सोहळ्यासाठी खटकर कलानमधील तब्बल १५० एकरांवरील गव्हाचे भुईसपाट करण्यात आल्याचे समोर आले आहे. 'द ट्रिब्यून'ने दिलेल्या वृत्तानुसार,  मान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होण्यासाठी १५० एकरावरील गहू भुईसपाट करण्यात आला आहे. शपथविधी समारंभाला हजर लोकांसाठी उभारण्यात आलेल्या मंडपासाठी जागा कमी पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मंडपाचा आकार १३ एकरांवरुन तब्बल १५० एकरांवर नेण्यात आला. या १५० एकरांवरील जवळपास २० शेतकऱ्यांना ४५ हजार रुपये प्रति एकर याप्रमाणे या नुकसानाची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com