सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीवरून भाजप आक्रमक

या पत्रात हजारे यांनी, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोल दराने विक्री करुन राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्राला उतरती कळा लावलेली आहे. राज्यातील १५ लाख शेतकऱ्यांचे ४९ साखर कारखाने हे कायद्याचा भंग करुन विक्रीच्या नावाखाली राजकीय नेत्यांनी ताब्यात घेतले आहेत. एवढेच नाही तर यामध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचे म्हटले आहे.
BJP aggressive over sale of co-operative sugar factories
BJP aggressive over sale of co-operative sugar factories

राज्यातील सहकारी साखर कारखाना विक्रीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी केला होता.त्यांनी यासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली उच्चाधिकार समिती नेमून चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र दीड महिने झाले तरी अद्याप अण्णा हजारेंच्या मागणीबाबत सरकारकडून काहीच निर्णय घेण्यात आला नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर धारेवर धरले. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील सहकारी साखर कारखाण्याच्या कारखान्यांच्या विक्रीबाबत तक्रार करणारे पत्र केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

व्हिडीओ पहा- 

या पत्रात हजारे यांनी, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोल दराने विक्री करुन राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्राला उतरती कळा लावलेली आहे. राज्यातील १५ लाख शेतकऱ्यांचे ४९ साखर कारखाने हे कायद्याचा भंग करुन विक्रीच्या नावाखाली राजकीय नेत्यांनी ताब्यात घेतले आहेत. एवढेच नाही तर यामध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचे म्हटले आहे. 

त्यामुळे सहकार चळवळीला धोका निर्माण झाला  आहे. राज्यातील राजकीय नेत्यांनी कायद्याचा भंग करुन सहकारी संस्थांकडून कवडीमोल दराने कारखाने खरेदी केले आहेत. यामध्ये तब्बल २५ हजार कोटींचा अपहार झाला असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी हजारे यांनी २४ जानेवारी २०२२ रोजी पत्राद्वारे केली होती. 

मात्र, कारवाईकडे राज्याचे दुर्लक्ष होत असल्याने सांगत त्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता. सोमवारी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंच्या तक्रारीची दखल घेणे गरजेचे असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे मागणीची पूर्तता करण्याचा आग्रह धरला. शिवाय उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेशही दिले असताना राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत आहे.किमान सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या तक्रारीची तरी दखल घेणे गरजेचे असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीला उत्तर देताना कारखाने चालविणे किती जिकीरीचे झाले आहे हे सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com