उस्मानाबाद जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा सुपडासाफ 

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने भाजपचा दारूण पराभव केला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. पंधरा पैकी १५ जागा जिंकत विरोधीपक्ष भाजपचा सुपडासाफ करत सत्ता राखली आहे.
ODCC Bank
ODCC Bank

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत (ODCC Bank Election) महाविकास आघाडीने भाजपचा दारूण पराभव केला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. पंधरा पैकी १५ जागा जिंकत विरोधीपक्ष भाजपचा सुपडासाफ करत सत्ता राखली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांच्या वाटेला प्रत्येकी पाच जागा आल्या आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या आमदार राणा जगजीतसिंह पाटील (Rana Jagajitsingh Patil) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

जिल्हा बँकेच्या (Osmanabad District Central Co-Oprative Bank) निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात चुरस वाढल्यानंतर प्रचार रंगात आला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या (MahaVikas Aaghadi) एकोप्याने भाजपला खातेही उघडता आले नाही. या निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. तर काही ठिकाणी उमेदवारच न मिळाल्याने त्याठिकाणी महाविकास आघाडीच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धुराळा उडाला होता. त्याचा  सोमवारी (ता. २१) निकाल जाहीर झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनमध्ये मतमोजणी झाली. पहिल्या टप्प्यात कळंब येथील विकास सोसायटी मतदारसंघाचा कल शिवसेनेच्या बाजूने लागला. बळवंत तांबारे यांनी ४० मते घेत आघाडी घेतली. या जागेसाठी महाविकास आघाडीला मोठी कसरत करावी लागली होती. भाजपने यंग ब्रिगेड (BJP Yuva Morcha) मैदानात उतरल्याने चुरस वाढली होती.

अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी निवडणुकीचा ताबा घेऊन मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीने एकोपा दाखविल्याने भाजपची डाळ शिजली नाही. काँग्रेसमधी असंतुष्ट असलेल्या तुरळक नेत्यांनी भाजपसोबत जाण्याची अप्रत्यक्ष हाक मतदारांनी ऐकली नाही. आणि कळंब तालुक्यात शिवसेनेच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय झाला.

याशिवाय उस्मानाबाद विकास सोसायटी मतदारसंघातून नानासाहेब पाटील मोठ्या मताधिक्याने विजय झाले. भाजपच्या उमेदवाराचा पाटील यांनी २२ मतांनी पराभव केला. इतरही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली असून भाजपला भोपळाही फोडता आला नाही. महाविकास आघाडीचे पाच उमेदवार बिनविरोध आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीला सत्ता मिळविणे आवाहन नव्हते.

मात्र, शिवसेनेच्या अंतर्गत गोटात दुफळीची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे उर्वरीत जागांसाठी काय होते, याकडे सर्वांचे लक्ष होते. ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना), मधुकर मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस), श्रावण सावंत (शिवसेना),सुनिल चव्हाण (काँग्रेस), बापूराव पाटील (काँग्रेस) यांनी आपल्या मतदारसंघात बिनविरोध वर्चस्व दाखविले होते. मात्र, उर्वरीत मतदानासाठी काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेरीस सर्वच जागा महाविकास आघाडीच्या पदरात पडल्याने भाजपला मोठी हार पत्करावी लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com