लखीमपूर खेरीत भाजपचा झेंडा कायम

पलिया, निघासन, गोला गोरखनाथ, श्रीनगर, धौरहरा, लखीमपूर, कस्ता आाणि मोहंमदी या मतदारसंघाचा समावेश आहे. काही मतदारसंघात सुरवातीला समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली.
Lakhimpur Kheri
Lakhimpur Kheri

लखीमपूर खेरी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या हिंसाचाराने देशभरात खळबळ उडाल्याने लक्षवेधी ठरलेल्या आठही विधानसभा(Assembly) मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. पलिया, निघासन, गोला गोरखनाथ, श्रीनगर, धौरहरा, लखीमपूर, कस्ता आाणि मोहंमदी या मतदारसंघाचा समावेश आहे. काही मतदारसंघात सुरवातीला समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. परंतु सायंकाळपर्यंत भाजपच्या उमेदवारांनी त्यांना मागे टाकत बाजी मारली. २०१७ च्या निवडणुकीतही आठही मतदारसंघात भाजपचेच उमेदवार विजयी झाले होते.

लखीमपूर खेरी(Lakhimpur Kheri) येथे चौथ्या टप्प्यांत सुमारे ६२ टक्के मतदान झाले होते. तत्पूर्वी लखीमपूरी येथील घटनेने वातावरण बदलले होते. लखीमपूरी खिरीच्या तिकुनिया येथील हिंसाचाराने भाजपला(BJP) निवडणूक सोपी जाणार नाही, असा तर्क बांधला जात होता. भाजपला आपला गड राखता येईल का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. केंद्रीय मंत्री(Union Minister) अजय मिश्रा टेनी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. हिंसाचार प्रकरणात त्यांचा मुलगा आशीष मिश्रा यांना तुरुंगात जावे लागले होते. त्याचा नकारात्मक परिणाम मतदानावर होईल, असे म्हटले जात होते. परंतु खेरी जिल्ह्यातील मतदारांनी भाजपच्या उमेदवारांवर विश्‍वास कायम ठेवला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com