Brucellosis in animal | Agrowon

गायी-म्हशीमध्ये गर्भपाताची समस्या

रोशनी गोळे
शनिवार, 15 जानेवारी 2022

संसर्गिक गर्भपात हा एक जीवाणूजन्य रोग असून त्याचा प्रादुर्भाव गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या तसेच माणसांमध्येही दिसून येतो.

संसर्गिक गर्भपात हा एक जीवाणूजन्य रोग असून त्याचा प्रादुर्भाव गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या तसेच माणसांमध्येही दिसून येतो. जनावरांना या रोगाची बाधा चारा, खाद्य आणि पाणी यातून होत असते. या रोगाचा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येतो.

गर्भपाताची लक्षणे-

गाभण गायी-म्ह्शीमध्ये गर्भ ४ ते ९ महिन्याचा आणि शेळ्या-मेंढ्यामध्ये गर्भ २ ते ५ महिन्याचा असताना गर्भपात होतो. गर्भपात झाल्यानंतर गर्भाशयाला सूज येते, गर्भाशयातून रक्तमिश्रित स्त्राव येतो. गर्भपातामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाला संसर्ग झाल्याने जनावरांची वार अडकण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. दूध उत्पादनात घट होऊन, जनावरांमध्ये तात्पुरता किंवा कायमचा वांझपणा येण्याची दाट शक्यता असते.

या आजाराचा प्रसार प्रामुख्याने निरोगी जनावरे बाधित जनावरांच्या जननेंद्रियांच्या संपर्कात आल्याने होत असतो. दूषित वीर्याच्या माध्यातूनही निरोगी गायी-म्हशींना या आजाराचा प्रादुर्भाव होतो. दूषित स्त्रावांचे थेंब उडल्याने डोळ्यांच्या श्र्लेष्म त्वचा, जखमांच्या संपर्कात आल्याने तसेच दुधावाटे प्रसार होतो.

हेही पाहा- 

रोगप्रतिबंधात्मक उपाय-
गर्भपात झालेल्या जनावरांना तत्काळ इतर जनावरांपासून वेगळे करावे. बाधित जनावरांना ऊर्जायुक्त, प्रथिनयुक्त आहार द्यावा. कळपामध्ये या आजाराचे प्रमाण १० % किंवा त्याहून अधिक असल्यास नव्याने  जन्मला  येणाऱ्या ६ ते ८ महिन्याच्या मादी वासरांना गर्भपाताविरुद्ध लसीकरण करून घ्यावे.

जनावरांमध्ये होणारा गर्भपात हा संसर्गिक आजार असल्यानं बाधित जनावरांकडून माणसाला देखील या रोगाची बाधा होत असते, यामुळे विशेष काळजी घेण गरजेचं आहे.


इतर कृषिपूरक
गाईचे गाभण काळातील व्यवस्थापनव्यायल्यानंतर वार अडकणे, कासदाह आणि गर्भाशय दाह...
कॉमन कार्प माशाचे प्रजनन तंत्रकॉमन कार्प माशाच्या बिजाची मागणी वाढत आहे. योग्य...
अंड्यात खरंच भेसळ असते का?अंड्याचे सर्वात बाहेरील आवरण म्हणजे त्याचे कवच...
कुक्कुटपालनात रोगनियंत्रण महत्वाचे माणसांप्रमाणे जनावरांमध्ये तसेच पशु-पक्ष्यांनाही...
जनावरांची वार का अडकते?जनावर व्यायल्यानंतर साधारणतः वार सहा ते आठ...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
शेळ्यांना द्या सुबाभुळचा चारा शेळ्यांच्या आहारात ४०% सुबाभळीचा वापर करावा....
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
खायला कोणती अंडी चांगली?तुम्ही अंडी खाल्लीत का ? कोणती खायची? गावरान अंडी...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
हिरव्या चाऱ्यासाठी नेपिअर लागवड तंत्रसंकरित नेपिअर या चारा पिकाच्या फुले जयवंत, यशवंत...
जातिवंत कालवड पैदाशीसाठी आधुनिक प्रजनन...आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरज असेल तेव्हाच पूर्ण...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....
बहुवार्षिक नेपियर गवत पशुपालन व्यवसायात ६० ते ७० % खर्च हा आहार...
गाय निगेटीव्ह एनर्जीमध्ये का जाते?आपल्या गोठ्यातील जनावरांचे संगोपन करत असताना...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
गायी-म्हशीमध्ये गर्भपाताची समस्यासंसर्गिक गर्भपात हा एक जीवाणूजन्य रोग असून त्याचा...