| Agrowon

कृषिक प्रदर्शन, बारामती

स्थळ: कृषी विज्ञान केंद्र, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, जि. पुणे पासून: 19/01/2018 पर्यंत : 22/01/2018 वेळ : 10:30am - 06:00pm संकेत स्थळ : http://www.kvkbaramati.com/index.aspx

बारामतीत कृषिक प्रदर्शन १९ जानेवारीपासून

बारामती, जि. पुणे : येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक प्रदर्शनास प्रारंभ व कृषी विज्ञान केंद्राचा रौप्यमहोत्सव येत्या १९ जानेवारी रोजी एकत्रित होणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी केव्हीकेचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली उपस्थित होते. चार दिवस सुरू राहणाऱ्या कृषिक प्रदर्शनामध्ये या वर्षी जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जनावरांचेही प्रदर्शन होणार असून, ८० जातींची विविध जनावरे या प्रदर्शनात असतील. खिलार, देवणी त्याचबरोबर श्वानाचेही प्रदर्शन यामध्ये होणार असून ग्रेहॉन्ड, पब, जर्मन शेपर्ड, कारवान, लॅब्राडॉर, डॉबरमॅन, बुलडॉग आदींसह इतरही जातींची कुत्री या प्रदर्शनात सहभागी असतील. 

व्यावसायिक शेतकऱ्यांना हे प्रदर्शन अधिक सखोलपणे पाहता यावे, यासाठी १९ व २० जानेवारी रोजी प्रवेशशुल्क आकारले जाणार असून २१ व २२ जानेवारी रोजी निःशुल्क राहणार आहे. या प्रदर्शनात भीमथडी यात्रेप्रमाणेच विषमुक्त अन्न ही संकल्पना राबविण्यासाठी अन्नदाता हे स्वतंत्र दालन यामध्ये राहणार आहे. 

सात तालुक्यांतील लोकप्रतिनिधींना निमंत्रण
प्रदर्शनाच्या निमित्ताने केव्हीकेचा रौप्यमहोत्सव आयोजित केला असून, १९ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता अप्पासाहेब पवार सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. केव्हीकेच्य़ा कार्यक्षेत्रातील सात तालुक्यांतील आमदार या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती राजेंद्र पवार यांनी दिली.

संपर्क व्यक्ती

KRISHI VIGYAN KENDRA, BARAMATI, At Post: Malegaon Khurd, Tal.Baramati, Dist. Pune, Pin 413115, Maharashtra, INDIA (Mob. 02112-255207/255227),