| Agrowon

जमीन सुपीकता चर्चासत्र

स्थळ: स्थळ : टिळक स्मारक मंदिर, पुणे पासून: 17/04/2018 पर्यंत : 17/04/2018 वेळ : 04:00pm - 09:00pm संकेत स्थळ : --

विशेष चर्चासत्र : जपाल माती, तर पिकतील मोती...

महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर जमिनीची सुपीकता घटत चालल्याने तज्ज्ञांकडून सावधनतेचे इशारे दिले जात आहेत. पण त्याकडे पाहतो कोण, कोणाला या जिव्हाळ्याच्या विषयात खराखुरा रस आहे, हा प्रश्नच आहे. मातीचा कसच गेला तर शेती कशी होणार, अन्नसुरक्षेचे काय होणार, शेतकऱ्याचे काय होणार, असे गंभीर प्रश्न यांतून पुढे येत आहेत. त्यासाठीच अॅग्रोवनने पुढाकार घेऊन २०१८ हे जमीन सुपीकता वर्ष म्हणून जाहीर केले आहे. 

अॅग्रोवनचा तेरावा वर्धापन दिन २० एप्रिलला साजरा होत आहे. यानिमित्त जमिनीची सुपीकता या विषयावर १७ एप्रिलला (मंगळवार) पुण्यात एका विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. मातीत राहून मातीवर काम करणारे शेतकरी आणि तज्ज्ञ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे अनुभवाचे बोल प्रत्यक्ष एेकण्याची संधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभणार आहे. 

चर्चासत्रातील मान्यवर व्याख्याते...
१) प्रताप चिपळूणकर
२) सुभाष शर्मा
३) वासुदेव काठे
४) डॉ. अजितकुमार देशपांडे

स्थळ : टिळक स्मारक मंदिर, पुणे
दिनांक व वेळ : १७ एप्रिल (मंगळवार) दुपारी ४ वा. 

 

 

संपर्क व्यक्ती

०२० - २४४५०८४५ (Mob. ०२० - २४४५०८४५), ०२० - २४४५०८४५ (Mob. ०२० - २४४५०८४५)