‘सकाळ’ वाचा, कूपन कापा, बक्षिसे जिंका!

‘सकाळ’तर्फे वाचकांसाठी सातत्याने विविध उपक्रम व योजना राबविल्या जातात आणि वाचकांकडूनही नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून महिलांसाठी राबविलेल्या `मैत्रीण’ व ‘सुगरण’ या दोन्ही स्पर्धांना, महिला वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यातून वाचकांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.
Sakal
Sakal

पुणे -  ‘सकाळ माध्यम समूहा’ ने दिमाखात ९० वर्षे पूर्ण करून ९१ व्या वर्षात प्रवेश केला आहे. गेल्या नऊ दशकांपासून ‘सकाळ’ आणि वाचक यांच्यात नाळ जोडलेली असून ती आणखी घट्ट करण्यासाठी सर्व वयोगटातील वाचकांसाठी ‘सकाळ’ ने प्रश्‍नमंजूषेचे आयोजन केले आहे. यानुसार ‘सकाळ @९० प्रश्नमंजूषा स्पर्धा-२०२२’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भरघोस बक्षिसेही देण्यात येणार आहेत.

‘सकाळ’तर्फे वाचकांसाठी सातत्याने विविध उपक्रम व योजना राबविल्या जातात आणि वाचकांकडूनही नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून महिलांसाठी राबविलेल्या `मैत्रीण’ व ‘सुगरण’ या दोन्ही स्पर्धांना, महिला वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यातून वाचकांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. आता वाचकांसाठी नव्या रूपात येणारी खुली प्रश्‍नमंजूषा स्पर्धा ही आजपर्यंतची ही सर्वांत मोठी असणार आहे.

स्पर्धकांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी या स्पर्धेत असणार आहे. यंदा आणखी आकर्षक बक्षिसे असून यात इ-बाइक, सोन्या - चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, स्मार्टफोन, गिअर सायकल, प्रेशर कुकर, डिनर सेट, स्मार्ट वॉच अशा आकर्षक बक्षिसांचा समावेश आहे. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रेस्टीज कंपनीचा स्टडी-इमर्जन्सी लॅम्प हे हमखास बक्षिस दिले जाणार आहे.

रविवारपासून सुरुवात

येत्या रविवारी २० फेब्रुवारीपासून ‘सकाळ @९० प्रश्नमंजूषा स्पर्धा-२०२२’ सुरुवात होईल. ‘सकाळ’च्या मुख्य अंकात दररोज प्रसिद्ध होणाऱ्या विशेष बातमीवर आधारित एक कूपन अंकात प्रसिद्ध होईल. त्यामध्ये एक प्रश्न दररोज विचारला जाईल व त्याचे उत्तर वाचकाने कूपनमध्ये लिहिणे अपेक्षित राहील. या स्पर्धेचा कालावधी १०० दिवसांचा असेल. त्यापैकी स्पर्धकाने कोणतीही ९० कूपन कापून, प्रवेशिकेत चिकटविणे आवश्यक आहे. एकूण १०० पैकी ९० बरोबर उत्तरांची कूपन बक्षिसासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com