केंद्र सरकारकडून ६०६.१९ लाख टन भातपिकाची खरेदी

भातपिकाच्या हमीभावाने एकूण खरेदीपैकी १८६.८५ लाख टन भातपीक एकट्या पंजाबमधून खरेदी करण्यात आले आहे. छत्तीसगडमधून ८२.६२ लाख टन भातपिकाची खरेदी करण्यात आली आहे. तेलंगणातील ६९. ०८ लाख टन भातपिकाची खरेदी करण्यात आली आहे.
paddy
paddy

केंद्र सरकारने २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात एकूण ६०६.१९ लाख टन भातपिकाची (paddy) खरेदी केली असल्याची माहिती केंद्रीय अन्न मंत्रालयाने (food ministry)दिली आहे. आजमितीस ७७ लाख शेतकऱ्यांना १,१८,८१२.५६ कोटी रुपयांच्या हमीभावाचा (MSP) लाभ झाला असल्याचे केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  

भातपिकाच्या हमीभावाने एकूण खरेदीपैकी १८६.८५ लाख टन भातपीक एकट्या पंजाबमधून खरेदी करण्यात आले आहे. छत्तीसगडमधून ८२.६२ लाख टन भातपिकाची खरेदी करण्यात आली आहे. तेलंगणातील ६९. ०८ लाख टन भातपिकाची खरेदी करण्यात आली आहे. हरियाणातून ५५. ३० लाख टन आणि उत्तर प्रदेशातून ५६.४९ लाख टन भातपिकाची खरेदी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ही खरेदीची आकडेवारी २३ जानेवारीपर्यंतची असल्याचे अन्न मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भातपिकाचा विपणन हंगाम ऑक्टोबरपासून सुरु होतो आणि सप्टेंबरचा महिना सुरूच असतो.

२०२०-२०२१ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने ८९५.८३ लाख टन भातपिकाची (paddy) हमीभावाने खरेदी केली होती.  ही खरेदी १.६९,१३३.२६ कोटी रुपयांची होती.           फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) आणि राज्य सरकारच्या यंत्रणांमार्फत केंद्र सरकार भातपिकाची हमीभावाने (MSP) खरेदी करत असते. 

व्हिडीओ पहा 

केंद्र सरकारकडून देशातील २३ पिकांना हमीभाव (MSP) जाहीर करण्यात येतो. त्यातील गहू आणि भातपिकाची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी केलेला गहू आणि तांदूळ राष्ट्रीय खाद्यसुरक्षा कायद्यानुसार विविध योजनांच्या माध्यमातून सार्वजनिक वितरण यंत्रणेद्वारे गरजू नागरिकांना दिले जाते.   

दरम्यान भातपिकाच्या हमीभावाने खरेदीचा मुद्दा देशात संवेदनशील बनला आहे.  देशातील भातपिकाचे उत्पादन वाढले असून केंद्र सरकारकडून भातपिकाच्या खरेदीबाबतचे आखडता हात घेतल्याचा आरोप करत तेलंगणा सरकारने राज्यातील सर्वच भातपिकाच्या हमीभावाने खरेदीचा आग्रह धरला आहे. तर पंजाबमधील शेतकऱ्यांनाही त्यांच्या गहू आणि भातपिकाच्या हमीभावाने खरेदीची हमी हवी आहे. त्यासाठी ते हमीभावाचा कायदा करण्याची मागणी करत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com