Chana price: बाजारात हरभऱ्याचे दर दबावात

देशात यंदा हरभरा आयात मोठ्या प्रमाणात झाली. त्यातच यंदा लागवड वाढली. देशात चालू रब्बी हंगामात हरभऱ्याची ८१ लाख हेक्टरवर पेरणी झाली. तर केंद्र सरकारने देशात १३१ लाख टन हरभरा उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला.
gram
gram

पुणेः देशात यंदा ८१ लाख हेक्टरवर हरभरा (Gram) पेरणी होती. सध्या हरभरा काढणी (harvest) जोमात आहे. नवीन मालाची बाजारात आवकही होत आहे. वाढलेली आयात (Import) आणि उत्पादन (Production) यामुळे पुरवठा अधिक होतोय. त्यातच प्रक्रिया उद्योगाची ( Proscessing ) मागणी सामान्य होती. केंद्राने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार २३० रुपये हमीभाव जाहिर केला. मात्र बाजारातील दर यापेक्षा कमी आहेत. मागील आठवडाभरात बाजारातील आवक वाढली मात्र दर ४ हजार २०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान होते.  देशात यंदा हरभरा आयात मोठ्या प्रमाणात झाली. त्यातच यंदा लागवड वाढली. देशात चालू रब्बी हंगामात हरभऱ्याची ८१ लाख हेक्टरवर पेरणी झाली. तर केंद्र सरकारने देशात १३१ लाख टन हरभरा उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला. पिकासाठी पोषक वातावरण होते. त्यामुळे आत्तापर्यंत हरभरा काढणी ५० टक्क्यांवर पोचली. म्हणजेच बाजारात हरभरा आवक होत आहे. मात्र वाढलेली आयात आणि उत्पादन यामुळे सध्या हरभरा दर दबावात आहेत. केंद्राने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार २३० रुपये हमीभाव जाहिर केला. मात्र बाजारातील दर यापेक्षा कमी आहेत. मागील आठवडाभरात बाजारातील आवक वाढली मात्र दर ४ हजार २०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान होते.  हे ही वाचाः देशातील बाजारात कापूस दरात सुधारणा

राजस्थानच्या बाजारात हरभरा आवक वाढली. मात्र हरभरा डाळीला कमी उठाव आहे. परिणामी हरभऱ्यालाही उठाव कमी राहिला. त्यामुळे दर दबावात राहिले. राजस्थानध्ये हरभऱ्याचा सर्वसाधारण सरासरी दर ४ हजार २०० ते ५ हजार ५० रुपयांच्या दरम्यान राहिला. जोधपूर बाजारात सर्वसाधरण दर ४ हजार ७०० रुपये होता. तर जयपूर येथे ५ हजार आणि केकडी येथे ४ हजार ६०० रुपये सर्वसाधारण दर मिळाला.  मध्य प्रेदशातून दिल्लीच्या बाजारापेठेत हरभऱ्याचा पुरवठा होतो. मात्र दिल्ली येथील बाजारांत हरभऱ्याला उठाव कमी होता. परिणामी मध्य प्रदेशातही हरभरा दर दबावात होते, असे जाणकारांनी सांगितले. मागील आठवडाभरात येथील बाजारात हरभऱ्याला ४ हजार ४०० ते ५ हजार १०० रुपयांदरम्यान दर मिळाला. इंदोर बाजारात सर्वसाधारण दर ५ हजार रुपयांवर होता. तर असोकनगर येथे ४ हजार ८०० रुपये, कटनी येथे ५ हजार रुपये सर्वसाधारण दर राहिला. हे ही वाचाः सोयाबीन बाजार आठवड्यात स्थिर महाराष्ट्रातही हरभरा आवक वाढत आहे. मात्र बाजारात डाळीला कमी उठाव राहिला. परिणामी दर दबावात होते. महाराष्ट्रात हरभऱ्याला ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत दर मिळाले. लातूर येथे सर्वसाधारण दर ४ हजार ८०० रुपयांवर होता. तर अकोला येथे ४ हजार ८०० रुपये, नागपूर येथे ४ हजार ७०० रुपये आणि नगर येथे ४ हजार ७०० रुपये सर्वसाधारण दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com