मोबाईल शॉपी मालकाकडून मुख्यमंत्री पराभूत!

निवडणुकीच्या काळात त्यांनी गावात मोटारसायकलवरून प्रचार केला आणि सार्वजनिक बसमधून जनतेशी संवाद साधला. चन्नी यांच्याकडे दोन कोटीची मोटार असून ते आम आदमी असल्याचा देखावा करतात, अशी टीका लाभ सिंग यांनी केली होती.
भदौर
भदौर

भदौर : भदौर शहरात मोबाईल शॉपी चालवणाऱ्या मालकाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव करण्याची किमया साधली आहे. प्रचारात आणि राहणीमानात कोणत्याही प्रकारचा देखावा न करणाऱ्या लाभ सिंगला भदौरच्या मतदारांनी पसंती दिली. आम आदमी पक्षाचे उमेदवार ३५ वर्षीय लाभ सिंग उगोके यांनी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा दणदणीत पराभव केला.

लाभ सिंग हे दोन खोलीच्या घरात राहतात आणि ते प्रथमच राजकीय (Political)मैदानात उतरले होते. निवडणुकीच्या काळात त्यांनी गावात मोटारसायकलवरून प्रचार केला आणि सार्वजनिक बसमधून जनतेशी संवाद साधला. चन्नी यांच्याकडे दोन कोटीची मोटार असून ते आम आदमी असल्याचा देखावा करतात, अशी टीका लाभ सिंग यांनी केली होती. लाभ सिंगचा साधेपणा हा जनतेला भावला. आम आदमी पक्षाकडून(Aam Aadmi Party) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चन्नी यांच्या विरोधात लढणारे लाभ सिंग हे कोण आहेत, याची उत्सुकता देशभरातील माध्यमांना लागली होती. 

लाभ सिंग यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यानंतर त्यांनी मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चे दुकान सुरू केले. लाभ सिंग यांना दोन मुले आहेत. आम आदमी पक्षात प्रवेश केल्यानंतर लभ सिंग यांना पक्षाच्या समितीवर घेण्यात आले. त्यानंतर गट प्रमुख आणि नंतर मंडळ प्रमुख केले. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी आपली मालमत्ता म्हणून स्वत:ची हीरो होंडा सांगितली असून ती २०१४ मध्ये खरेदी केलेली आहे. २०१७ च्या निवडणुकीत लाभ सिंग यांना उमेदवारी देण्याबाबत विचार झाला होता. परंतु आम आदमी पक्षाने पीरमल सिंग धौला यांना तिकीट दिले. त्यांची या मतदारसंघावर चांगली पकड होती. लाभ सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले की, मला लोकांचे शुभेच्छा संदेश असून त्यांच्या मते आपण मुख्यमंत्री चन्नी यांना पराभूत करून इतिहास घडवू’. अर्थात हे वाक्य आजच्या निकालातून खरे ठरले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com