येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?

गेले तीन ते चार दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. येते दोन दिवस राज्यातील तापमान कसं असेल, वाचा सविस्तर...
cold wave warning
cold wave warning

पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून विदर्भातल्या काही ठिकाणी थंडीची लाट आलीये. तर इतर ठिकाणी पारा सरासरीच्या (average temperature) खाली घसरलाय. उत्तर भारतातून येणाऱ्या कोरड्या आणि थंड वाऱ्यांचा हा परिणाम असल्याचं हवामानशास्त्र विभागाच्या प्रसिद्धीपत्रकावरून कळतं. त्यामुळे एकूण विदर्भच गारठलाय. अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही खाली आलंय

आज सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्येही हवामानशास्त्र विभागाच्या  (IMD) अंदाजाप्रमाणे विदर्भातल्या काही ठिकाणी थंडीची लाट कायम राहिली. तर आज दिवसभरासाठी नागपूर वेधशाळेनं विदर्भातल्या बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा 'यलो अलर्ट' (yellow alert) कायम ठेवलाय.

Next 5 days weather warning for Vidarbha Dated 28.01.2022 #weatherwarning #imdnagpur #imd pic.twitter.com/aQgha6GfA0

— Regional Meteorological Centre, Nagpur (@RMC_Nagpur)

विदर्भातल्या काही ठिकाणच्या कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त घसरण झाली होती. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तांत्रिकदृष्ट्या थंडीची तीव्र लाट ओसरली असली तरी थंडीचा जोर मात्र कायम आहे. दुसरीकडे कोकणात मात्र राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत थंडी कमी असल्याचं आढळून आलं. कोकणातील किमान तापमान (minimum temperature) सरासरीच्या तुलनेत दिड ते तीन अंश सेल्सिअसनं कमी असल्याची नोंद झाली असून कमाल तापमानात (maximum temperature) उलट दिड ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ झालीये. 

हा व्हिडिओ पाहिलात का? : 

येते 48 तास विदर्भात थंडीची लाट (cold wave conditions) कायम राहणार असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला असून त्यानंतर मात्र थंडी काही अंशी कमी होण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि कोकणाच्या तापमानात कुठलाही मोठा बदल होण्याची शक्यता नसल्याचं हवामानशास्त्र विभागाच्या माहितीवरून स्पष्ट होतं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com