शेतीमालाचा वायदेबाजारः सोयाबीन, कांद्याच्या किमतींत उतार

फेब्रुवारी महिन्यात मका, हरभरा, मूग, सोयाबीन, तूर व कांदा यांच्या किमती वाढत होत्या. कापूस, हळद व टोमॅटो यांच्या किमतींत उतरता कल होता. कांद्याच्या किमतीही २२ फेब्रुवारीनंतर उतरू लागल्या आहेत.
Commodity futures market: Soybean, onion prices fall
Commodity futures market: Soybean, onion prices fall

फ्युचर्स किमतीः सप्ताह- २५ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२२ १ फेब्रुवारी पासून NCDEX मध्ये मक्याचे जुलै डिलिवरीसाठी आणि MCX मध्ये कापसाच्या ऑगस्ट डिलिवरीसाठी फ्युचर्स व्यवहार सुरु झाले. फेब्रुवारी महिन्यात मका, हरभरा, मूग, सोयाबीन, तूर व कांदा यांच्या किमती वाढत होत्या. कापूस, हळद व टोमॅटो यांच्या किमतींत उतरता कल होता. कांद्याच्या किमतीही २२ फेब्रुवारीनंतर उतरू लागल्या आहेत. हरभरा व हळद यांची आवक फेब्रुवारी महिन्यात वाढली.  इतर सर्व पिकांची आवक कमी होत आहे.   गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात सोयाबीन व कांद्याच्या  किमती कमी झाल्या. इतर पिकांच्या किमती वाढल्या. मक्याच्या किमती ४.६ टक्क्यांनी वाढल्या. किमतींतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत. कापूस/कपाशी MCX मधील कापसाचे व कपाशीचे  राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) फेब्रुवारी महिन्यात कमी होत होते. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव घसरून  रु. ३६,६७६ वर आले. एप्रिल डिलिवरी भाव १.४ टक्क्यांनी वाढून रु. ३७,६२० वर आले. कपाशीचे एप्रिल डिलिवरी भाव  रु १,९६३ वर स्थिर आहेत. मका मक्याच्या स्पॉट (छिंदवाडा) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ४.६  टक्क्यांनी वाढून  रु. २,१५० वर आल्या आहेत.  फ्युचर्स (एप्रिल  डिलिवरी) किमती या सप्ताहात रु. २,०८८ वर आल्या  आहेत.  जून फ्युचर्स किमतीस  रु. २,००८ वर आल्या आहेत. त्या स्पॉट किमतींपेक्षा ६.६ टक्क्यानी कमी आहेत. मक्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. १,८७० आहे.  मक्याची मागणी वाढती राहणार आहे.  पण रबीतील मक्याची आवकसुद्धा पुढील सप्ताहात सुरु होईल. हळद हळदीच्या स्पॉट (निझामाबाद) किमती फेब्रुवारी  महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या  रु.  ९,२३२ वर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती रु. ९,३५८ वर आल्या आहेत. हळदीत अजून तेजीचे वातावरण आहे; पण आवक आता वाढू लागली आहे.   हरभरा हरभऱ्याच्या  स्पॉट (बिकानेर)किमती फेब्रुवारी मध्ये घसरत होत्या.  या सप्ताहात  त्या १.२ टक्क्यांनी वाढून रु. ४,९८१ वर आल्या आहेत.  हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,२३० आहे. आवक वाढत आहे. मूग मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ७,०५० होती; या सप्ताहात ती त्याच किमतीवर स्थिर आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,२७५ आहे.  आवक आता कमी होत आहे. सोयाबीन सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) फेब्रुवारी महिन्यात वाढत होती. गेल्या सप्ताहात सरासरी किमत ७ टक्क्यांनी वाढून रु. ७,६२२ वर आली होती. या सप्ताहात ती ०.८ टक्क्यांनी घसरून  रु. ७,५६४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ३,९५० आहे. तूर तुरीची  स्पॉट किंमत (अकोला) फेब्रुवारी महिन्यात वाढत होती. गेल्या सप्ताहात ती १.७ टक्क्यांने वाढून  रु. ६,१३३ वर आली होती. या सप्ताहात ती  पुन्हा १.७ टक्क्याने वाढून  रु. ६,२४० वर आली. तुरीचा हमीभाव रु. ६,३०० आहे.  तुरीची आवक कमी होऊ लागली आहे. किमती वाढत्या राहतील. कांदा कांद्याची  स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या  सप्ताहात  रु. २,१६७ होती; या सप्ताहात ती १९.८ टक्क्यांनी घसरून रु. १,७३८ वर आली आहे.  गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची आवक घटली. पुढील महिन्यात रबीची आवक सुरु होईल. पिंपळगावमध्ये कांद्याचे दर २२ फेब्रुवारीनंतर घसरल्याचे दिसले. टोमॅटो टोमॅटोची स्पॉट किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. ७६५ होती; या सप्ताहात ती  वाढून  रु. ७७८ वर आली आहे. आवक आता घसरू लागली आहे. (सर्व किमती प्रति क्विंटल. कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी, कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com