युपी काँग्रेसची घोषणा : कर्जमाफी, गहू-तांदळाची एमएसपी वाढवणार

शेतकऱ्यांच्या गहू आणि तांदूळाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्यासोबतच काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये शेणखरेदीची योजना आणणार आहे.
UP Election
UP Election

वृत्तसेवा - उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ (Farmers Loan Waiver) करण्यासह शेतकऱ्यांच्या गहू आणि तांदळाला २५०० रुपये प्रति क्विंटल आधारभूत किंमत देण्याचे (Minimum Support Price)आश्वासन काँग्रेस (Congress) पक्षाने दिले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बुधवारी (ता.१९) शेतीबाबतची श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. 

यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) टीका केली. केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी दिली नाही. तसेच शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप बघेल यांनी केला. शेतकऱ्यांच्या गहू आणि तांदूळाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्यासोबतच काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये शेणखरेदीची योजना (Cow Dung Buy Scheme) आणणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतीच्या खर्चात वाढ झाल्याचा आरोपही त्यांनी केला. 

केंद्र सराकारच्या कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) दिल्लीत शेतकऱ्यांना एक वर्ष आंदोलन करावे लागले. त्यामुळे शेतकरी विरोधी सराकर अशी भाजपची प्रतिमा निर्माण झाली आहे. त्याचाच फायदा घेत काँग्रेसने शेतकऱ्यांच्या मुद्याला हात घातला आहे. त्यातही लखीमपूर (Lakhimpur) येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून हत्या केल्याचा आरोप भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा मुलावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मुद्दा काँग्रेस उचलून धरताना दिसत आहे. निवडणुका आल्या की, सगळ्याच राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा कळवळा येतो. पण सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहतात. ही वस्तुस्थिती आहे...   

दरम्यान, देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. यामध्ये सर्वात मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता सर्व पक्षांनी आश्वासनांची खैरात करण्यास सुरूवात केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com