cotton price: देशातील बाजारात कापूस दरात सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजार दर वाढल्याने भारतात कापसाच्या दरात सुधारणा झाली. देशात कापसाचे दर ८० हजार रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. तर काही बाजारांत खंडीचे दर ८५ हजार रुपयांवर पोचले होते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. एक खंडी ३५६ किलो कापसाची असते.
cotton
cotton

पुणेः अमेरिकेच्या कापसाला (cotton) मागणी आहे. मात्र येथील कापूस साठा कमी झाला. त्यातच चीनची (china) खरेदी सुरु आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर वाढले. याचा परिणाम देशातील कापूस दरावरही (cotton price) होत आहे. आज काही बाजारांत हंगामातील उच्चांकी दर (highest rate) मिळाला. अकोट बाजार समितीत सोमवारी उच्चांकी ११ हजार ८५० रुपये दर मिळाल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. तर देशातील बहुतेक बाजार समित्यांत कमाल दर १० हजारांच्या पुढे होता. जागतिक पातळीवर यंदा कापसाचा वापर वाढला. तसेच उत्पादन घटले. परिणामी दरात सुधारणा झाली होती. अमेरिकेची कापूस निर्यात वेगाने सुरु आहे. अमेरिकेतून यंदा ३ लाख ७१ हजार लाख गाठी कापूस निर्यातीचे उद्दीष्ट आहे. आत्तापर्यंत उद्दीष्टाच्या ९६ टक्के कापूस निर्यात झाली. त्यातच टेक्सास राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे येथील कापूस लागवड काहीशी कमी राहू शकते. युएसडीएने मार्चच्या अहवालात जागतिक कापूस वापर वाढल्याचे म्हटले. तसेच पुढील वर्षासाठीचा शिल्लक साठाही कमी असल्याचे सांगितले. हे ही वाचाः अमेरिकेचे सोयाबीन का खातेय भाव? चीन कापसाचा मोठा खरेदीदार आहे. अमेरिकेच्या कापसाला चीनची मागणी असते. यंदाही चीनकडून कापसाची खरेदी वेगाने सुरु आहे. चीनसोबतच इतर देशांची कापूस आयात वाढली. परिणामी अमेरिकेचा कापूस साठा कमी झाला. तर कापसाची मागणी कायम आहे. त्यामुळे इंटरनॅशनल काॅटन एक्सचेंजवर कापसाचे दर विक्रमी पातळीवर पोचले. सोमवारी कापसाचे मे महिन्याचे वायदे १२८.४०० सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजार दर वाढल्याने भारतात कापसाच्या दरात सुधारणा झाली. देशात कापसाचे दर ८० हजार रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. तर काही बाजारांत खंडीचे दर ८५ हजार रुपयांवर पोचले होते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. एक खंडी ३५६ किलो कापसाची असते. दरात सुधारणा झाल्यानंतर बाजारातील आवकही वाढली होती. असे असूनही कापूस खंडीचे दर दोन दिवसांत २ ते ५ हजार रुपयांनी वाढले. मात्र कापसाची आवक सरासरीच्या तुलनेत कमीच होती. पुढील महिन्यापासून ही आवक आणखी कमी होत जाईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. कापड उद्योगाकडे कापसाचा साठा कमी आहे. त्यातच या दरात जिनिंग व्यापारी आपल्याकडील साठा या भावात विकायला तयार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. या सर्व परिस्थितीमुळे कापसाचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे. हे ही वाचाः हमीभावाने तूर खरेदीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मागील दोन महिन्यांपासून देशात कापूस एका भावपातळीवर स्थिर होता. मात्र मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर कापूस वायद्यांत सुधारणा झाली. मार्च महिन्याचे वायदे ३९ हजार ९१० रुपये प्रतिगाठीने झाले. तर एप्रिलचे वायदे ४० हजार ४४० रुपयांवर पोचले होते. यंदाच्या हंगामात कापसाने पहिल्यांदा ४० हजारांचा टप्पा गाठला आहे. वायद्यांबरोबरच बाजार समित्यांमध्येही कापसाचे दर सुधारले आहेत. अकोट बाजार समितीत सोमवारी उच्चांकी ११ हजार ८५० रुपये दर मिळाल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. तर देशातील बहुतेक बाजार समित्यांत कमाल दर १० हजारांच्या पुढे होता. महाराष्ट्रात कापसाला ९ हजार ५०० ते ११ हजार रुपये सरासरी दर मिळाला. तर गुजरातमध्ये सर्वसाधारण दर ९ हजार ८०० ते १० हजार रुपयांच्या दरम्यान होता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com