Dairy business with agriculture Exclude from 'RCEP': Shetty | Agrowon

शेतीसह दुग्ध व्यवसायाला ‘आरसीईपी’मधून वगळा ः शेट्टी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

कोल्हापूर  : शेतीसह दुग्ध व्यवसायाचा समावेश प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) योजनेत करत असताना देशातील शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय उत्पादक भरडला जाण्याची शक्यता आहे. यामुळे भागीदारी योजनेमधून शेतीसह दुग्ध व्यवसायाला वगळण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली.

कोल्हापूर  : शेतीसह दुग्ध व्यवसायाचा समावेश प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) योजनेत करत असताना देशातील शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय उत्पादक भरडला जाण्याची शक्यता आहे. यामुळे भागीदारी योजनेमधून शेतीसह दुग्ध व्यवसायाला वगळण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली.

श्री शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारकडून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. भारत सरकारने दुग्ध व्यवसायासंदर्भात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांशी उपपदार्थाबाबत करार करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राष्ट्रीय स्तरावर भारत हा दुग्ध व उपपदार्थ उत्पादनात आघाडीवर आहे. जर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेल्यामधून उपपदार्थ आयात होऊ लागले तर देशातील दुग्ध व्यवसाय कोलमडून जाईल. परिणामी, देशामध्ये जवळपास १० कोटी दुग्ध उत्पादक शेतकरी संकटात येऊन बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे दुग्ध व्यवसाय व शेती या बाबतीत धोरण ठरवीत असताना, देशातील सर्व शेतकरी संघटनांना विश्वासात घेऊन निर्णय व्हावा, अशी मागणीही शेट्टी यांनी केली.

याबाबत बोलताना वाणिज्य मंत्री पीयूष गोयल म्हणाले, की या योजनेतून देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याबरोबर रोजगार वाढवून महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन दुग्ध व्यवसाय कोलमडून जाणार नाही, याची काळजी घेऊ. तसेच उपपदार्थ आयात धोरण ठरवत असताना देशातील डेअरी क्षेत्रातील दूध संस्थांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...