पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ प्रा. दिगंबर दुर्गाडेंच्या गळ्यात

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी कोण बसणार हे आता स्पष्ट झालं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.
PDCC Bank
PDCC Bank

पुणे - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी कोण बसणार हे आता स्पष्ट झालं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे. निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांना संधी देण्यात आली आहे. आज सकाळी जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत सर्व नवनिर्वाचित संचालकांना आमंत्रित करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री आणि जिल्हा बँकेचे संचालक अजित पवार (Ajit Pawar) आणि गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे पाटील (Dilip walase Patil) यांनी चर्चा करुन दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे यांच्या नावावर शिक्का मोर्तब केले. 

दिगंबर दुर्गाडे यांनी 'ड' वर्ग अन्य सहकारी संस्थांच्या मतदारसंघातून शिरूर आणि हवेलीचे भाजप तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांना पराभूत केले आहे. फराटे यांना अनुभवी दुर्गाडे यांच्याकडून तब्बल ६८४ मतांनी पराभव स्विकारावा लागला आहे. तर चांदोरे यांनी मुळशी तालुका मतदारसंघातून बँकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे (Atmaram Kalate) यांना धक्का देत विजय मिळवला आहे. चांदोरे यांना २८ मत मिळाली होती, तर कलाटे यांची गाडी १७ वरचं थांबली होती.

सुरुवातीला अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे शिलेदार रमेशआप्पा थोरात यांना पुन्हा संधी देण्यात येईल, असे अंदाज बांधले जात होते. मात्र दिगंबर दुर्गाडे यांचे नाव आज उजवे ठरले. याशिवाय बँकेच्या निवडणुकीत तब्बल ८५ टक्के मताधिक्याने विजयी झालेले अशोक पवार (Ashok Pawar), जुन्नरमधूनप्रत्येक आमदारकीवेळी तडजोड म्हणून बँकेत राहणाऱ्या संजय काळे (Sanjay Kale), आमदार दिलीप मोहिते आणि वेल्ह्यातून रेवणनाथ दारवटकर यांची ही नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होती.

पुणे जिल्हा बँकेच्या २०२१-२०२६ या पाच वर्षाच्या कार्यकाळासाठीच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी २ जानेवारी २०२२ रोजी निवडणूक झाली होती. ४ जानेवारीला मतमोजणी होऊन, निकाल जाहीर करण्यात आले. संचालक मंडळाच्या २१ पैकी १६ जागा जिंकत, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा बॅंकेवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँगेसचेच विकास दांगट अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. ते केवळ कागदोपत्री अपक्ष आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com