अंडी शाकाहरी कि मांसाहारी?

ब्रॉयलर म्हणजे ६ ते ८ आठवड्याची कोंबडी जी फक्त मांस उत्पादनासाठी वापरली जाते. लेयर म्हणजे हिच कोंबडी १७ आठवड्याची झाल्यावर अंडी द्यायला सुरुवात केली कि आपण तिला लेयर असं म्हणतो.
Eggs are veg or nonveg
Eggs are veg or nonveg

मुळातचं अंडी देणं ही कोंबडीची नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजेच पिल्लाचं रुपांतर जेव्हा कोंबडीत होते आणि जेव्हा कोंबडी १७ आठवड्याची होते तेव्हा ती अंडी द्यायला सुरुवात करते. अंडी शाकाहरी कि मांसाहारी या प्रश्नाच उत्तर घेण्याचा प्रयत्न आज आपण करूया.

ब्रॉयलर आणि लेयर म्हणजे काय?

ब्रॉयलर पण कोंबडी आणि लेयर पण कोंबडीच असते. हा फरक कोंबड्यांच्या वयानुसार आणि त्यांच्या मानवी वापर हेतुनुसार बदलत असतो.  ब्रॉयलर म्हणजे ६ ते ८ आठवड्याची कोंबडी जी फक्त मांस उत्पादनासाठी वापरली जाते. लेयर म्हणजे हिच कोंबडी १७ आठवड्याची झाल्यावर अंडी द्यायला सुरुवात केली कि आपण तिला लेयर असं म्हणतो. चांगली अंडी देण्याची क्षमता असलेली कोंबडी साधारणतः दिवसाला एक अंड देत असते. आपल्याकडे विविध ब्रॉयलर आणि लेयर जातीच्या कोंबड्या आहेत. ज्या त्या विशिष्ट हेतूने वापरल्या जातात. ब्रॉयलर (Broiler) मध्ये व्हाईट रॉक आणि लेयर (Layer)  मध्ये व्हाईट लेघहोर्न, ब्लाॅक मिनोर्का या जातींचा समावेश होतो.

अंड शाकाहारी कि मांसाहारी?

कोंबडी अंडी देत असताना जर ती कोंबड्याच्या सानिध्यात आली तरचं त्या अंड्यात जीव निर्माण होतो. गावाकडे आजही कोंबडीला खुराकावर म्हणजे अंडी उबवायला (hatcheries) बसवलीय... असं आपण ऐकलं असेल...पण ठेवलेली सगळीच अंडी उबवतात का ? तर नाही... असं का होत? तर ज्या अंड्यातून पिल्ले बाहेर येतात ती मांसाहारी आणि ज्यातून पिल्लू बाहेर येत नाही ते शाकाहारी अंड. आपण जी बाजारात उपलब्ध असलेली अंडी खातो...ती शाकाहारी अंडी असतात. कारण या कोंबड्या फक्त अंडी उत्पादनासाठी वापरल्या जातात. मात्र जिथे अंडी उबवण केंद्र (hatcheries) असतात, किंवा पिल्लांचं उत्पादन घेतलं जातं...अशा कोंबडीबरोबर कोंबडाही असल्याने त्या अंड्यात जीव निर्माण होऊन...हे मांसाहारी बनते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com