अकोला जिल्ह्यात कापूस २२ हजार हेक्टरने वाढण्याचा अंदाज

अकोला जिल्ह्यात कापूस २२ हजार हेक्टरने वाढण्याचा अंदाज
अकोला जिल्ह्यात कापूस २२ हजार हेक्टरने वाढण्याचा अंदाज

अकोला : कापसाला या हंगामात चांगला दर मिळत आहे. त्यामुळे आगामी हंगामात जिल्ह्यातील त्याच्या लागवड क्षेत्रात सुमारे २२ हजार हेक्टर वाढीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी सुमारे सात लाख २० हजार बीटी बियाणे पाकिटांची मागणीसुद्धा करण्यात आली. जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या विभागीय सहसंचालकांकडे याबाबत वाण निहाय मागणी सादर केली. 

जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक आहे. जिल्ह्याचे सरासरी लागवड क्षेत्र १ लाख ७८ हजार ६०० हेक्टर अाहे. गेल्या हंगामात यापैकी १ लाख ४३८०२ हेक्टरवर पेरणी झाली होती. या वेळी हे लागवड क्षेत्र १ लाख ६५ हजार हेक्टरपर्यंत वाढू शकते. म्हणजेच २२ हजार हेक्टर वाढीव क्षेत्र राहील. बीटी कापसाची सात लाख २० हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली. 

जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी लागवड क्षेत्र चार लाख ८२ हजार ६२० हेक्टर आहे. यात सोयाबीन हे प्रमुख पीक अाहे. कापसाचे क्षेत्र दुसऱ्या क्रमांकावर असते. या वर्षी कापसाचा दर पाच हजारांवर राहिला.

२०१७-१८ च्या हंगामात गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या पिकाबाबत अनिश्चितता तयार झाली होती. मात्र या हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यात मोठे यश मिळाले. सोबतच कापसाचा हंगाम सुरू झाल्यापासून दर ४५०० पेक्षा अधिक राहला. शेवटी तो सहा हजार रुपयांवर गेला. इतर पिकांच्या तुलनेत कापसाच्या पिकाने जिल्ह्यात शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा दिला. त्यामुळे कपाशी लागवडीकडे कल वाढण्याची शक्यता आहे.

जिल्हा यंत्रणांनी तयार केलेला हा आराखडा विभागीय कृषी सहसंचालकांकडे पाठविण्यात आला. यावर आगामी काळात होणाऱ्या जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीत चर्चा होऊन मंजुरी दिली जाईल.

पीकनिहाय क्षेत्र (हेक्टरी)

पीक  सरासरी क्षेत्र  प्रस्तावित क्षेत्र
सोयाबीन १११६१०  १६५०००
संकरित  कापूस १७१२१९ १६००००
सुधारित कापूस ७३८१  ५०००
मूग ५१२२०  ३१३५०
उडीद  १३४९०  २५२००
तूर  ५४९७०   ५८३००
ज्वारी  ६१३१० १८५५०

पीकनिहाय बियाण्यांची गरज (क्टिंटल) 

सोयाबीन ४९५००
संकरित कापूस ४०००
सुधारित कापूस ६०० 
ज्वारी १६८८
तूर  ३९३५
मूग २४४५
उडीद १९६६
मका ७५
तीळ १४
एकूण ६४२३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com