शेतकऱ्यांच्या नजर गाळपाकडे

काही मोजक्या मोठ्या कारखान्यांकडे पुढच्या महिना अखेरपर्यंत गाळप करण्याची क्षमता असून ही अपेक्षा सर्वच कारखान्यांकडून करणे योग्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. आता आपल्या परिसरातील कारखान्यांनी गाळप बंद केले तर आपला शिल्लक ऊस कुठे न्यायचा?, अशी चिंता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
sugar industry
sugar industry

हंगाम संपत आला तरी राज्यातील ऊस  (Sugarcane) शिल्लक आहे. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांसमोर (sugar industry) या अतिरिक्त उसाच्या गाळपाचा पेच निर्माण झाला आहे.  काही कारखाने वाढीव उसाचे गाळप करण्याची क्षमता नसल्याचे सांगत आहेत तर उसाच्या शेवटच्या टिपरापर्यंत गाळप करण्याचे आदेश साखर आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.  

हे ही वाचा     - कसे आहे केंद्राचे गव्हाच्या हमीभावाने खरेदीचे उद्दिष्ट ?

गेल्या साखर हंगामात २५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील केवळ १७८ कारखाने सुरु होते. एकूण हंगामात गेल्यावर्षी या कारखान्यांनी ८०.४७१ दशलक्ष टन उसाचे गाळप करून ८.२३७ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले होते.  

या साखर हंगामात १९७ कारखाने सुरु असून आजवर ९१.६०७ दशलक्ष उसाचे गाळप केलेले आहे तरीही अद्याप शेतकऱ्यांकडे ऊस बाकी आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजून ३० दशलक्ष टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत असून त्याचे गाळप व्हायचे बाकी आहे. त्यामुळे आपला ऊस शक्य तेवढ्या लवकर घेऊन जावा, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.      

 हे ही वाचा   -  देशात कापूस लागवड क्षेत्र १५ टक्के विस्तारेल

गेल्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांनी २५ फेब्रुवारीपर्यंत ८.२३७ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले होते. या हंगामात कारखान्यांनी ९३८ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा आकडा पार केलेला आहे.     हंगाम संपत आल्यावरही गाळपासाठी ऊस शिल्लक असल्यामुळे कारखान्यांनी त्यांची दैनंदिन गाळपाचे क्षमता वाढवली आहे. विशिष्ट कालावधीनंतर गाळप करणे शक्य नसल्याचेही अनेक कारखान्यांच्या संचालकांनी म्हटले आहे. 

एका ठराविक कालावधीनंतर गाळप सुरु ठेवणे सर्व कारखान्यांना शक्य नाही, सरकारने ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. बऱ्याच कारखान्यांनी अनेक अडचणींवर मात करून आपल्या क्षमतेनुसार उसाचे गाळप केलेले आहे, अशा अवस्थेत त्यांच्यावर अधिक गाळपाचे ओझे टाकणे वस्तुस्थितीला धरून नसल्याची प्रतिक्रिया साखर उद्योग (Sugar industry)  क्षेत्रातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
 
काही मोजक्या मोठ्या कारखान्यांकडे पुढच्या महिना अखेरपर्यंत गाळप करण्याची क्षमता असून ही अपेक्षा सर्वच कारखान्यांकडून करणे योग्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. आता आपल्या परिसरातील कारखान्यांनी गाळप बंद केले तर आपला शिल्लक ऊस कुठे न्यायाचा?, अशी चिंता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.     दरम्यान महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यापूर्वीच आपापल्या निर्धारित परिसरातील ऊस संपेपर्यंत कारखान्यांना गाळप सुरु ठेवणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करून तसे न करणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गाळप हंगाम बंद केल्याची घोषणा करण्यापूर्वी साखर कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयाची पूर्वसंमती घ्यावी, असेही गायकवाड यांनी नमूद केले आहे. शिल्लक उसासाठी संबंधित कारखान्याच्या संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात येणार आहे.    आपल्या कार्यक्षेत्रातील अतिरिक्त उसाचे गाळप शक्य नसलेल्या कारखान्याच्या संचालक मंडळाने निकटच्या कारखान्याशी समन्वय साधून या उसाच्या गाळपाचे व्यवस्था करावी, जेणेकरून शेतकरी त्यांचा ऊस संबंधित कारखान्याकडे गाळपासाठी घेऊन जातील,असेही गायकवाड यांनी नमूद केले आहे.    

व्हिडीओ पाहा -

साखर कारखाने अशा प्रकारे शेतकऱ्यांचा ऊस वाऱ्यावर सोडू शकत नाहीत. आपल्या कार्यक्षेत्रात इतर कारखान्यांनी येऊ नये, यासाठी आग्रही असलेले कारखाने अतिरिक्त उत्पादनाच्यावेळी आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळप कसे काय नाकारू शकतात?, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.  गाळपासाठी ऊस मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ऊस लागवड करायला लावणारे कारखाने कुठल्याही जास्तीचा ऊस नाकारू शकत नसल्याचेही शेट्टी यांनी नमूद केले आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com