थंडीपासून फळबागेचे संरक्षण

फळबाग सल्ला
फळबाग सल्ला

सध्या किमान तापमानात घट होऊन थंडी वाढलेली आहे. त्याचा परिणाम फळपिकांवर होतो. हे लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात.

डाळिंब

 • अति थंडीमुळे डाळिंबाची पाने जळतात, फळे तडकतात.
 • बागेला मोकाट सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
 • जेथे बागेमध्ये बहर धरलेला आहे आणि फळवाढीची अवस्था आहे तेथे पहाटेच्या वेळेस धूर करावा.
 • बागेतील तोडलेल्या फांद्यांचे अवशेष, कचरा जाळून नष्ट करावा.
 • संत्रा, मोसंबी

 • थंडीमुळे मृग बहर धरलेल्या बागेत फळांची वाढ थांबली आहे. या काळात उपाययोजना म्हणून १३ः००ः४५  हे १० ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे.
 • थंडीच्या काळात फळझाडांना पहाटेच्या वेळेस बांगडी पद्धतीने पाणी द्यावे.
 • फळबागेत तसेच बांधावर रात्री शेकोटी पेटवून धूर करावा. द्राक्ष
 •  थंडीच्या काळात मुळांच्या परिसरात पाण्याचा ताण पडणारा नाही, अशा रीतीने ठिबक सिंचनाने वेळोवेळी पाणी द्यावे.
 •  किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्यास मुरमाड ते मध्यम जमीन असल्यास दोन वेलींमधील ओळीत मोकाट पद्धतीने पाणी द्यावे. म्हणजे त्या ठिकाणीही जमिनीतील थंड हवा कमी होऊन तेथे पाणी राहील.
 •  वेलीच्या दोन ओळींमधील जमिनीला भेगा पडलेल्या असल्यास हलकी मशागत करून त्या बुजवून घ्याव्यात. यामुळे जमिनीत मुळांपर्यंत थंड हवा जाणार नाही, मुळांना इजा होणार नाही.
 •  थंड हवा बागेत शिरून बागेचे तापमान कमी होऊ नये याकरिता बागेच्या कडेने बारदान किंवा जास्त गेजचे शेडनेट लावावे. यामुळेही बागेतील हवामान उबदार राहण्यास मदत होते.
 • घडाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी पेपर लावावा.
 • केळी

 • थंडीमुळे नवीन लागवड केलेल्या कंदाच्या उगवणीला उशीर होतो, उतिसंवर्धित रोपे लावलेली असल्यास वाढ खुंटते, मुळांची संख्या व लांबी खुंटते, अन्न व पाणी शोषण करण्याच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो.
 • केळीची वाढ खुंटते, घड निसवण्यास उशीर लागतो, पाने पिवळी पडतात.
 • उपाय

 • थंडीच्या काळात बागेला पाण्याचा ताण देऊ नये. शक्यतो रात्री ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे.
 • बाग तसेच बांधावर ठिकठिकाणी रात्री शेकोटी पेटवून धूर करावा. यामुळे बागेतील वातावरणात उष्णता वाढते.
 • थंड वा­ऱ्यापासून संरक्षणासाठी बागेभोवती शेडनेट, ताटी किंवा बारदानाचे कुंपण करावे.
 • निसवलेल्या बागेतील घडांवर स्कर्टिंग बॅग लावावी.
 • नवीन कांदे बागेस प्रति झाड बुंध्याभोवती रिंग पद्धतीने २०० ग्रॅम, तर मृग बागेस प्रतिझाड ५०० ग्रॅम निंबोळी ढेप द्यावी.
 • जुन्या कांदेबागेतील फळवाढीच्या अवस्थेतेतील घड हे कोरड्या केळी पानांनी किंवा २ ते ६ टक्के सच्छिद्रतेच्या १०० गेज जाडीच्या पांढ­ऱ्या प्लॅस्टिक पिशवीने झाकावेत.
 • थंडी लाटेच्या काळात बागेमध्ये १९:१९:१९ हे खत २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे झाडांना अन्नद्रव्यांचा पुरवठा होईल.
 •  : डॉ. कैलास डाखोरे, ७५८८९९३१०५   : डॉ.विनोद शिंदे, ९९७०२२८३४५ (ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com