
वाढत्या थंडीमुळे पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी फळबागेला, भाजीपाला तसेच फुलपिकांना रात्री हलके पाणी द्यावे जेणेकरून जमीन उबदार राहण्यास मदत होईल. रा
त्रीच्या वेळी फळबागेत जागोजागी पालापाचोळा किंवा काडीकचरा जाळून धूर करावा. त्यामुळे बागेचे तापमान वाढवण्यास मदत होईल.
केळी बागेत किमान तापमानात झालेल्या घटीमूळे वाढ खुंटली असल्यास ००:५२:३४ १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बागेतील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
घड निसवले असल्यास घड सच्छिद्र स्कर्टींग बॅगने झाकावेत. केळी बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.
आंबा बागेत फळगळ होऊ नये म्हणून ००:५२:३४ १.५ किलो + जिब्रॅलिक ॲसिड १.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
द्राक्ष बागेत घडावर पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून द्राक्ष घड वर्तमान पत्राने झाकून घ्यावेत.
किमान तापमानात घट झाल्यामुळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे, जेणेकरून बागेत मणी तडकण्याची समस्या उद्भवणार नाही.
टोमॅटो पिकावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन १८.२% + डायफेनकोनॅझोल (११.४ % एससी) १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन (२३ % एससी) २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.