शेतमालाची निर्यात गाठणार ५० अब्ज डॉलर्सचा टप्पा !

२०२२ या आर्थिक वर्षात भारतीय शेतमाल निर्यात ५० अब्ज डॉलर्सवर जाईल, असा अंदाज केंद्र सरकारकडून वर्तवण्यात आला आहे. यात प्राधान्याने तांदूळ, मांस, पोल्ट्री निर्यातीचे प्रमाण वाढीव राहण्याचा कयास आहे.
Agri Export
Agri Export

२०२२ या आर्थिक वर्षात भारतीय शेतमाल निर्यात (Agricultural Export) ५० अब्ज डॉलर्सवर जाईल, असा अंदाज केंद्र सरकारकडून वर्तवण्यात आला आहे. यात प्राधान्याने तांदूळ, मांस, पोल्ट्री (Poultry) निर्यातीचे प्रमाण वाढीव राहण्याचा कयास आहे. २०२१ या आर्थिक वर्षात भारताच्या शेतमालाची निर्यात ४१.२५ अब्ज डॉलर्स एवढी होती. त्यापूर्वी २०१९ -२०२० या आर्थिक वर्षात भारताच्या शेतमालाची निर्यात ३५.१६ अब्ज डॉलर्स एवढी होती.

२०२२ मध्ये भारताच्या तांदूळ निर्यातीचे प्रमाण ९.५ अब्ज डॉलर्सवर जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे प्रमाण जगातील तांदूळ निर्यातीच्या निम्मे आहे. भारताच्या एकूण तांदूळ निर्यातीत बिगरबासमती तांदळाची निर्यात ८.५ अब्ज डॉलर्सवर जाण्याचा कयास वर्तवण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात भारताच्या शेतमाल निर्यातीत (Agriculture Export) सातत्याने वाढ होत असून २०२२ साली ही निर्यात ५० अब्ज डॉलर्सचा पल्ला गाठेल, असा विश्वास सरकारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान भारताच्या सीफूड, (Sea Food) प्लांटेशनसह कृषी उत्पादनाच्या निर्यातीचे प्रमाण ३१.०५ अब्ज डॉलर्स एवढे होते. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० साली हे प्रमाण २५.२ अब्ज डॉलर्स एवढे होते. यंदा सीफूडसच्या (Seafoods) निर्यातीचे  प्रमाण ८ अब्ज डॉलर्सचा पल्ला गाठेल, असा अंदाज आहे. तर कॉफीच्या निर्यातीचे प्रमाण ४५ टक्के आणि तृणधान्यांची निर्यात ६६ टक्क्यांवर जाईल, असा कयास आहे. याखेरीज मासे, दूध आणि पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीत १० टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे.

कोविड -१९ महामारी आणि सततच्या लॉकडाऊनमुळे उदभवलेल्या विपरीत परिस्थितीतही कृषी क्षेत्राने चांगली कामगिरी पार पडली आहे. त्यानंतरच्या काळातही कृषी क्षेत्राच्या कामगिरीचा आलेख चढता राहिला आहे.  या आर्थिक वर्षातील पहिल्या आठ महिन्यात गव्हाच्या (Wheat) निर्यातीत ८२१ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर साखरेच्या (Sugar) निर्यातीचे प्रमाण ६२ टक्क्यांनी वाढले आहे. इतर तृणधान्यांची (Cereals) निर्यात ६९ टक्क्यांनी वाढली आहे.      

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com